Saturday 26 September 2015

ज्ञानरचनावाद

ज्ञानरचनावाद

रचनावादी अध्ययन व अध्यापनासाठी सध्या संपुर्ण महाराष्ट्रा मध्ये सातारा जिल्ह्यातील कुमटे बीट पँटर्न गाजताेय सन २०१५ १६ प्रयाेगीक तत्वावर काही शाळा मध्ये हा प्रकल्प राबवीला जाणार आहे माझी शाळा त्यासाठी निवडली असुन त्याबाबत नुकतेच सातारा येथे प्रशिक्षण झाले त्यामध्ये प्रत्येक विषय कसा शिकवावा व मुलांना शिक्षकांनी  शिकवण्याची गरज नसुन मुल निसर्गता शिकते फक्त शिकण्यासाठी याेग्य वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे असे रचनावाद सांगताे कुमठे बीटामध्ये गेली तीन वर्ष ही अध्यापन पध्दती राबवली असुन ३९ शाळामध्ये १ही विद्यार्थी अप्रगत नाही …

ज्ञानरचनावाद म्हणजे काय ???

१)भराडेमॅडम= यांनी pptच्या सहाय्याने मेंदु शिकण्याचा अवयव आहे.शरीराच्या २% वजन असणार्‍या मेंदुस २०% प्राणवायु लागतो.मेंदु वाढ गर्भात ७०%,पहिल्या वर्षी १५%,तीन वर्षात १०%,बारा वर्षात ५%होते.जन्मतः१००अब्ज मज्जापेशी मेंदुत असतात.शिकणे नैसर्गिक आहे.सुखद अनुभवांनी मज्जापेशींना फुटवे फुटतात तर दुःखद अनुभवांनी मज्जापेशी नष्ट होतात.मुलास तु चांगला आहेस गोड आहेस असे प्रबलन देत रहाणे मेंदुविकासास महत्वाचे आहे.आपण वर्तनवादी पध्दतीचे गुलाम आहोत.गणित सोडवण्याच्या पध्दती सांगु नये मुलांनी शोधायला हवे.मुलांस भीती वाटते तेव्हा न्युरोकार्टिक्सकडुन भावनिककडे प्राणवायु पुरवठा होतो खंडित पुरवठा सतत होणारी मुले उपद्रवी बनतात.मुलांस आनंददायी वातावरणात शिक्षण चांगले होते.

इंग्रजी भाषा
instruction 400अर्थासह संग्रहित केल्या.रोज १०सुचना देणे.Genral question 150 संकलित केले परिपाठावेळी 5प्रश्न विचारणे.तसेच Myselfप्रमाणेMy friend My School  My Teacher घेणे.स्वयंअध्ययनकार्ड flashcard रोज 5 घेणे.dictionary मधुन शब्द शोधण्याचा खेळ घेणे.नेटवरुन भरपुर rhymes घेणे.word puzzelsवone word     one sentence   one question  असा शब्दावरुन वाक्य सांगणे प्रश्न तयार करणे.अशा गोष्टी सातत्याने घेणे.

वर्गतयारी  मार्चपासुन पहिली वर्ग सुरु मुले खेळण्यात रमतात.सोपी बडबडगीते घेतो.
उपक्रम=१)मोठ्या चित्रांची पुस्तके पहाणे चित्रवर्णन करणे.२)चित्रगप्पा मारणे३)आठवड्यातुन एकदा ठरवुन गप्पा मारणे.४) न ठरवता गप्पा मारणे.५)वाचनासाठी चित्रशब्दवाचनएकत्र नंतर फक्त चित्रवाचन व नंतर फक्त शब्दवाचन = पाचचित्रकार्डसंच लागोपाठ दोन दिवस द्यावेत.संयम ठेवावा.६)चित्राशी शब्द जोड्या लावणे खेळ घेणे.प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र संच हवा.
हिमोग्लोबीन कमतरतेचा मेंदुवर बौध्दीक क्षमतेवर परिणाम होतो.यासाठी कुमठे बीटात सर्व शाळांत सेंद्रियशेती केली जाते कसदार माती बनवली जाते त्यातील भाज्या शालेय पोषण आहार टाकल्या जातात.
मराठी विषय. शाळा मुलांसाठी आहेत अधिकारी आलेतरी मुले कामांत मग्न असतात.सप्टेंबरपर्यंत मुले वाचु लागतात.
उपक्रम=१)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे.
२)शब्दभेंड्या खेळ घेणे.३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.
लेखनाचे उपक्रम १)धुळपाटीवर लेखन २)हवेत अक्षर गिरविणे.३)समान अक्षर जोड्या लावणे.४)अक्षर आगगाडी बनवणे.५)पाहुणा अक्षर ओळखणे.६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.७)बाराखडीवाचन करणे.८)बाराखडीतक्तेवाचन करणे.९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.११)कथालेखन करणे.१२)कवितालेखन करणे.१३)चिठठीलेखन करणे.१४)संवादलेखन करणे.१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.

गणित १)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे२)वर्गातील वस्तु मोजणे३)अवयव मोजणे४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.६)आगगाडी तयार करणे७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.९)अंकाची गोष्ट सांगणे.१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे १२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.१३)बेरीजगाडी तयार करणे.१४)अंकांपुढे वस्तु मांडणे १५)गठ्ठे सुट्टे सांगणे१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे.
ज्ञानरचनावाद दूतांसाठी खास+++

वाचन म्हणजे फक्त अक्षरांचे उच्चार करणे नाही.
वाचन म्हणजे सांकेतिक चिन्हांच्या आधारे शब्दांचा उच्चार करुन शब्दात दडलेला अर्थ समजून घेणे म्हणजेच लिखित मजकुराचा अर्थ कळणे आहे.

वाचन पुर्वतयारी—

१)नजरेने आकारातील साम्यभेद ओळखणे.
२)डावीकडुन उजवीकडे नजर फिरविण्याचा सराव.
३)बोललेले शब्द डावीकडुन उजवीकडे लिहिले जातात समजणे.
४)दृश्य शब्दसंग्रह=उपक्रम.

१)मुलांची हाती त्यांच्या नामपटट्या द्या व दुसर्‍या संचातील पट्टी तशीच शोधणेस सांगा. मुले स्वतःचे व इतराचे नाव चार दिवसात ओळखण्यास वाचण्यास शिकेल.

२.) वर्गातील वस्तुवर नावाच्या चिठठ्या लावा. दुसरा संचातील चिठ्ठी मुलास द्या. तुझ्या चिठ्ठीवर कोणते नाव लिहिले आहे शोधुन काढणेस सांगणे.
सांगीतलेल्या नावाची चिठ्ठी दाखवणेस.

३.)परिचयाच्या चित्रांचा वापर करुन पुढील खेळ घेणे.
सलग तीन दिवस मुलांना चित्रशब्दकार्ड वाचन घ्या नंतर चित्राखाली बोट ठेवुन नावाचे वाचन घ्या. सर्वांस शब्दकार्ड वाटा.व एकच चित्रकार्ड दाखवुन याचे नाव कोणाकडे आहे त्याला पुढे बोलवा. चित्रशब्दकार्डाखाली लावुन खात्री करु द्या.अशीच सर्व चित्रशब्दकार्ड शोधण्याचा सराव घेणे.
पुढील तीन दिवस शब्दकार्डाची शब्दकार्डाशी जोड्या लावणे खेळ घेणे.
पुढील तीन दिवस शब्दकार्डाची चित्रकार्डाशी जोडी लावणे.

४) दहा शब्द झाले की, वाक्यवाचन सुरु करावे. हा आंबा(चित्र)आहे वाचन करणे. नंतर चित्राजागेवर शब्द ठेवुन वाक्य वाचनाचा सराव घेणे.
दृकशब्दसंपत्ती वाढ ४० पर्यंत जाणे ही वाचनपुर्वतयारी झाली.इथपर्यंत मुले अंदाजाने वाचतात पुर्ण शब्द वाचतात.पण हे प्रत्यक्ष वाचन नव्हे. प्रत्यक्षवाचनासाठी मुले शब्दाचा एकत्रित विचार करतात व वाचन सुलभ होते.
अक्षर परिचय कसा शिकवावा?
अक्षरे ध्वनींची चिन्हे आहेत समजा क शिकवायचा आहे तर क ऐकवा म्हणुन घ्या व क आवाजाचे शब्द विचारा ते फळ्यावर लिहा. आता ठसठशीत मोठा क दाखवुन हा क असा लिहीतात दाखवा. आता क त्यांनी सांगीतलेल्या शब्दांत कुठे आहे शोधण्यास सांगा.
गृहपाठ=वर्तमानपत्रातील क कापुन आणणे.
अक्षर दृढीकरणासाठी हवेत अक्षर गिरवणे घ्या,जमीनीवर अक्षरे लिहुन त्यावर खडे चिंचोके मणी ठेवण्यास सांगा.कधी नुसत्याच वस्तु देवुन अक्षर बनवणेस सांगा.परिचित शब्द बनवता येतील असे अक्षरगट प्राधान्याने शिकवा ६ अक्षरे शिकुन झाली की त्यापासुन शब्द बनवणेचा खेळ घ्या.

दृश्यवाचनाने परिचित शब्दांपासुन अक्षरे वेगळी करुन ती उलटसुलट क्रमाने ठेवुन शब्द बनवणे खेळ घेणे.

स्वरचिन्ह परिचय-

पाच सहा अक्षरे शिकवुन झाली की एका स्वरचिन्हाचा परिचय करुन देणे.
स्वरचिन्हे खुणा आहेत काना मात्रा वेलांटी न शिकवता आ ए ई उच्चार लक्षात रहाणे महत्वाचे आहे.कान्याला आ व मात्रेला ए म्हणावे.मुलांना येणार्‍या अक्षरास स्वरचिन्ह जोडुन होणारा उच्चार करणेचा सराव घेणे.अक्षर परिचय चालु असताना टप्प्याने सर्व स्वरचिन्ह परिचय करुन द्यावा.

वाक्यवाचन—

मुले शब्द तयार करु लागली की छोट्या वाक्याची पुस्तके वाचण्यास द्यावीत. प्रत्येक पानावर चित्र व एक वाक्य  सहा वाक्याचे पुस्तक बनवणे.जमतील तशी चित्रे काढावीत. मुलांचा वाचनाचा आत्मविश्वास वाढत जाईल.

जोडाक्षराचे वाचन—

एकच प्रकारचे जोडाक्षर शब्द मोठ्याने वाचुन मुलांसमोर ठेवावा.कात्रीने अक्षर जोडणी कापुन दोन्हीचे उच्चार करुन दाखवावेत.जोडाक्षर बनविणे नंतर सारख्या जोडाक्षरी शब्दवाचनाचा सराव घेणे.
र चे चार प्रकार शिकवणे.

परिच्छेद आकलन—

दैनंदिन कामावरील परिच्छेद वाचणे.त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहिणे.

प्रकटवाचन—

योग्य ठिकाणी विराम घेणे व योग्य स्वराघातासह वाचन करणे महत्वाचे.शिक्षकांनी उतारा वाचुन दाखवावा. शिक्षकांमागोमाग एक एक वाक्य विद्यार्थी वाचतील. पुन्हा पुर्ण उतारा विद्यार्थी योग्य विराम व स्वराघातासह वाचतील.
वाचनसाहित्य भरपुर हवे.

परिच्छेदवाचन—

शब्द डोंगर वाचन घेणे. अधिक शब्दांचे वाक्य वाचुन आकलन होणे महत्वाचे आहे.

Monday 21 September 2015

[19/09 1:21 PM] Shaikh Asif: अहमद,नगर,मदन,गदर,मन,अहम,हम.......असे अनेक शब्द.....४०पर्यंत
[19/09 1:24 PM] Shaikh Asif: .....ळा....शेवट ला ळा अक्षर येणारे शब्द लिहण्यास सांगितलो....तर मुलांनी ६० शब्द लिहले
[19/09 1:30 PM] Shaikh Asif: त्या पासून छोटीशी कविता ही मी तयार करण्यास सांगितली...

एक होती शाळा
तिचा आहे लळा
भिंतीचा रंग पिवळा
वरती आहे माळा
वर्गात आहे फळा
त्याचा रंग काळा
जसा दिसतो कावळा
[19/09 4:14 PM] Shaikh Asif: [19/09 3:58 PM] Shaikh Asif: आधुनिक कावळा किंवा ४G कावळा

        एक गाव होतं.त्या गावात राजू नावाचा मुलगा राहत होता.तो दररोज सकाळ संध्याकाळी नदीच्या काठावर फिरायला जात असे.एके दिवशी असचं तो फिरायला जात असताना त्याला एक कावळा त्या नदिच्या किणारी एका बाटलीला काय तरी शोधत होतं तेव्हा कावळ्याने खूप दूरवर उडत गेला.कावळा एका दुकानाच्या समोर गेला त्या ठिकाणी एक स्ट्रा होतं.ते स्ट्रा घेऊन त्या बाटलीकडे गेला आणि तो त्याने त्या बाटलीतील कोल्ड्रींक्स पिऊन दूर अशा ठिकाणी उडून गेला.राजू हे सर्व पहात होता.

तात्पर्य:काळानुरूप आपल्यात बदल  केला पाहिजे...किंवा आधुनिकपद्धतीच आवलंब केला पाहिजे..

🌹आसिफ मौला शेख🌹
[19/09 4:05 PM] Shaikh Asif: एक गाव होतं त्या गावा जवळून एक नदी वाहत होती.त्या गावातील एक मूलगा होता तो हूशार आणि प्राणीमात्राना मदत करीत असे.मग एके दीवशी तो शाळेत जात असताना त्याला एक कावळा तडफडत असलेला दिसला.तो इकडे तिकडे पाहू लागला तेव्हा तिथे त्याला एक बाटली पडलेली दिसली.तो ती बाटली घेऊन नदीतून भरून आणला आणि त्या कावळ्याच्या चोचीत घातला.कावळा पाणी पिल्यानंतर दूर असा उडून गेला.

🍀  🇵  🇷  🇲 🇦 🇸 🇰 🇮 🍀
▪  इंग्रजी वाचायला शिकविण्याची ▪
             सुरुवात कशी करावी.
______________📖______________
_______________________________
📕प्रथम इंग्रजी अल्फाबेट व त्यांचे सर्वच शक्य असलेले उच्चार पाठांतर करुन घ्यावे.
_______________________________
👉🏾Like 🅰- ए- अ, आ, अॅ etc.
              🅾- ओ, अॉ, अ
              🅿- पी- प
              Ⓜ- एम- म
🔹विद्यार्थ्यांना उच्चारांचा सराव देऊ प्रथम दोन अक्षरी शब्द वाचायला द्यावे.

A अॅ+ t ट= अॅट.
An अॅन, en एन,  ing इंग, ot अॉट
_______________________________

🔹आता "at" असलेल्या शब्दांचा संग्रह करुन वाचनाचा सरावा द्यावा.

🔸C'at' =क +अॅट = कॅट
🔸M'at'=म + अॅट = मॅट
Bat, sat, rat, fat, hat, pat, tat.
_______________________________
🔹वरीलप्रमाणेच "an" असलेल्या खालील शब्दांच्या वाचनाचा सराव देता येईल.

🔸A अॅ + n न= An =अॅन

🔸B'an'= ब + अॅन=बॅन
🔸C'an= क + अॅन=कॅन
Fan, man, pan, ran, tan, van etc..
_______________________________
🔹"en" असलेल्या या शब्दाच्या वाचनाचा सराव द्यावा.
🔸e ए + n न= एन

🔸T'en' ट + एन =टेन
🔸M'en' म + एन=मेन
Bend, hen, pen, send, tent, went,lens, rent, sent, dent etc.
_______________________________
🔹ing 'इंग' असलेल्या शब्दांचा संग्रह करुन वाचनाचा सराव देता येईल.
🔸"ing"  इंग

🔸S'ing'   सिंग
🔸K'ing'   किंग
🔸W'ing'  विंग

Ding, ping, ring, ting, bring, zing, sting, etc.
_______________________________
🔹'ot' अॉट पासून 👇🏽अशा शब्दांचा सराव द्यावा.

Cot, dot, got, hot, lot, not, plot, slot, mot, sot etc...
_______________________________
🔹 वरीलप्रमाणे प्रथम सोप्या शब्दांचा
सराव देऊन कालांतराने काठीण्यपातळी वाढवत न्यावी.

🔹याप्रमाणे सुरुवातीला अशा सोप्या
शब्दांचा सराव दिल्यास विद्यार्थी वाचू
लागतात.

🔹''आपल्याला इंग्रजी वाचता येते ही भावणा त्याच्या मनात निर्माण झाल्याने त्याचा confidence वाढतो परिणामी विद्यार्थी स्वतःच इंग्रजी वाचनाचा सराव करु लागतात. यामुळे त्यांची इंग्रजी विषयात रुची वाढते''.
_______________📖_____________
     🚹English club group 2 🚹

नवोपक्रम

[26/07 5:42 PM] Shaikh Asif: http://www.teachersastransformers.org/innovation-idea/use-technology
[26/07 5:42 PM] Shaikh Asif: sir changli site aahe pahilat ka
[26/07 5:42 PM] Shaikh Asif: http://googleweblight.com/?lite_url=http://www.teachersastransformers.org/innovationcell/mh/2013&ei=e0IQwCa7&lc=en-IN&s=1&m=75&ts=1437837483&sig=AKQ9UO9_shoXkL4UXYZ6ZlBqRhP4Mg0qVQ
[26/07 5:43 PM] Shaikh Asif: ya saglya site changlya aahet...paha sir plz comment pahilyanantar..