Tuesday 27 October 2015

mscert प्रश्नसंच

MSCERT ने खालील प्रश्नसंच Download करण्यासाठी उपलब्ध आहेत.

इयत्ता पहिली :संख्याज्ञान

इयत्ता दुसरी :संख्याज्ञान

इयत्ता तिसरी :संख्याज्ञान

इयत्ता चौथी :संख्याज्ञान

इयत्ता पहिली एक अंकी बेरीज

इयत्ता पहिली एक अंकी वजाबाकी

इयत्ता पहिली गणित (बेरीज, वजाबाकी )

द्वितीय सत्र

इयत्ता पहिली भूमिती
इयत्ता दुसरी भूमिती
इयत्ता तिसरी भूमिती
इयत्ता चौथी भूमिती
इयत्ता पहिली ते चौथी मापन

इयत्ता पहिली आकृतिबंध
इयत्ता दुसरी आकृतिबंध
इयत्ता पहिली ते चौथी माहितीचे व्यवस्थापन
इयत्ता दुसरी दोन अंकी वजाबाकी बिनाहाताच्याची
इयत्ता दुसरी बिनाहाताच्याची बेरीज
इयत्ता दुसरी व तिसरी
इयत्ता दुसरी हातच्याची बेरीज
इयत्ता दुसरी (वजाबाकी ,गुणाकार ,भागाकार )
इयत्ता तिसरी ते पाचवी
( बेरीज ,वजाबाकी ,गुणाकार ,भागाकार )

इयत्ता तिसरी अपूर्णांक
इयत्ता चौथी अपूर्णांक
दशांश अपूर्णांक
परिमेय,अपरिमेय ,वास्तव संख्या
बीजगणित
भूमिती
शेकडेवारी
नफा तोटा
गुणोत्तर-प्रमाण
🅰🆚
वरील सर्व प्रश्नसंच Download करा.

http://www.mscert.org.in/QuestionBank.aspx

Saturday 17 October 2015

वाचन

चला जाणून घेऊया - "वाचनाचे टप्पे"
वाचनाचे टप्पे :
एक आराखडा - जीन एस्. चॉल
सारांशात्मक मराठी रूपांतर -  वर्षा सहस्रबुद्धे (क्वेस्ट’करिता)
(‘वाचन-विकासाचे टप्पे’ (Stages of Reading Development), न्यूयार्क, मॅक ग्रॉहिल बुक कंपनी, १९८३ यामधील दुसर्‍या प्रकरणामधून.
अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून ते परिपक्वतेच्या टप्प्यापर्यंत टप्पे प्रस्तुत आराखड्यात विचारात घेतले आहेत. त्यापैकी सहा टप्प्यांचे विवेचन येथे आहे. त्यात “खोटे-खोटे” वाचण्यापासून ते सर्जनशील परिपक्व वाचनापर्यंत विशिष्ट क्रमाने प्रगती होते. प्रत्येकाचा प्रगतीचा वेग भिन्न असला, तरी साधारणपणे याच क्रमाने टप्पे पार केले जातात. अगदी, विशेष गरज असलेले विद्यार्थीही याच टप्प्यांमधून जातात.
व्यक्ती किंवा मूल आणि त्याच्या भोवतालच्या वातावरणातले घटक यांच्यामधील आंतरक्रियांवर प्रगतीचा वेग ठरतो.
प्रस्तुत लेखात, वाचनाचे टप्पे सैद्धांनितक स्वरूपात मांडावेत असा हेतू नाही. ढोबळपणाने गृहितकांच्या रूपात ते मांडले आहेत. वाचन कौशल्ये कसकशी आत्मसात केली जात आहेत याचा अंदाज येण्यासाठी, त्यावर काहीसे नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची मदत होईल अशी आशा वाटते.
व्यक्तीमध्ये आणि भोवतालामध्ये असे नेमके काय काय घडते की ज्याचा वाचन विकासाशी संबंध आहे, हा या आराखड्याचा गाभ्याचा भाग आहे. आराखडा ढोबळ आहे, मात्र त्याचा संशोधनांमधील बारीकसारीक तपशिलांशी, निष्कर्षांशी सूक्ष्म पण थेट संबंध आहे. अवतीभवतीच्या घटकांची दखल संशोधक मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. जोडीला, मज्जासंस्थेशी संलग्न अशा घटकांचीही मी विशेष दखल घेतली आहे.
पियाजे आणि इनहेल्डर यांचा विकासविषयक सिद्धांत आणि फ्रॉईड यांचा मनोविश्लेषणाचा सिद्धांत यांच वोल्फ यांनी केलेला तुलनात्मक अभ्यास, पेरी यांनी केलेल्या महाविद्यालयीन काळातील बौद्धिक आणि नैतिक विकासाचा अभ्यास, डेल यांच्या बरोबर मी केलेल काम, तसेच १९५८ मध्ये मी स्वतः केलेले वाचनाविषयीचे काम...अशा अनेक अभ्यासांचा प्रभाव या आराखड्यावर आहे. वाचन अक्षमता असणार्‍यांबरोबर क्लिनिकमध्ये आणि शिक्षक म्हणून मी केलेल्या कामाचाही या आराखड्यासाठी उपयोग झाला आहे.
‘वाचन’ समजून घेण्यासाठी मौल्यवान ठरतील अशा कल्पना, विचार आणि पद्धती या अभ्यासांमधून घेऊन प्रस्तुत आराखडा बनवला आहे. हा आराखडा पुढील गृहीतकांवर आधारित आहे.
1.भाषाविकासाच्या आणि बुद्धिविकासाच्या टप्प्यांत आणि वाचनविकासाच्या टप्प्यांत साधर्म्य आहे.
2.पियाजे यांच्या सिद्धांतामधील परिभाषेत सांगायचे, तर ‘ग्रहण करून समजून घेणे’ (अ‍ॅसिमिलेशन) आणि आधी असलेल्या चौकटीत फेरबद्दल करून नव्या गोष्टी ‘सामावून घेणे’ (अ‍ॅकोमोडेशन) या प्रक्रिया वाचन शिकणारा करीत असतो. अशा प्रकारे वाचन ही त्याच्यासाठी एक समस्यानिवारणाची सातत्यपूर्ण प्रक्रिया असते. आधी जे शिकले, त्याचा वापर करून नवीन मागण्या पूर्ण करायच्या असे सर्व टप्प्यांवर घडते.
3.सर्व टप्प्यांमधून पुढे जाताना व्यक्तीची निरनिराळ्या ‘भोवतालांशी’ आंतरक्रिया होत असते – घरी, शाळेत, समाजात आणि संस्कृतीत.
4.विशिष्ट टप्पा शिकणार्‍याने गाठला किंवा कसे हे मोजण्यासाठीच्या निकषांमुळे, प्रमाणित निकषाधारित मूल्यमापनाला नवे परिमाण मिळेल. वाचनाचा विकास कसा होतो याविषयीचे आकलन वाढायला याची मदत होईल. वाचायला शिकणार्‍यांना अधिक मदतीची गरज असेल, तर त्यासाठी जरूर ते तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीही त्याची मदत होईल.
5.‘वाचन’ हाच शब्द सर्रास सर्व टप्प्यांसाठी वापरला जात असला, तरी टप्प्याटप्प्यानुसार, लिखित मजकुराबाबत वाचक जे करतो, ते निरनिराळे असेल. नजरेची हालचाल, नेत्र-ध्वनि यांचा आवाका, वाचनाचा वेग इत्यादींची कार्यक्षमता टप्प्याटप्प्यानुसार बदलेल.
6.टप्प्यांनुसार ‘वाचना’कडे बघण्याची दृष्टी आणि समज बदलत जाईल. अधिकाधिक गुंतागुंतीचा मजकूर वाचण्याची क्षमता प्रत्येक पुढच्या टप्प्यावर विकसित होत जाईल.
7.मजकुराला येणारा वाचकाचा प्रतिसादही प्रत्येक पुढील टप्प्यात अधिक प्रगल्भ होत जाईल.
8.प्रत्येक टप्प्यासाठी कोणते पूर्वज्ञान आवश्यक आहे हे विशद केले असेल. टप्पा जितका पुढचा, तितके वाचकाचे जगातले अनुभव जास्त, समज जास्त आणि ज्या विषयावर वाचायचे त्या विषयाची समज जास्त.
9.एकाच टप्प्यातील सवयींमध्ये फार काळ रेंगाळल्यास वाचक पुढच्या टप्प्याकडे जरा उशिराने जाईल, कदाचित पुढच्या टप्प्यात शिरण्यात त्याला बर्‍याच अडचणी येतील. उदारहणार्थ, सुटी अक्षरे ओळखण्यामागोमाग लगेचच वेग वाढवून, संदर्भातील अर्थपूर्ण वाचनाला सुरुवात झाली नाही, तर वाचक अक्षरे ओळकू येण्याच्या यशापाशीच रेंगाळतो. त्यापुढील तिसर्‍या टप्प्यात, नेमकेपणाने वाचून नवी माहिती मिळवण्यापाशी पोहोचण्याकरिता नवी आव्हाने पेलायला वाचक शिकला नाही, तर संदर्भावरून अर्थाची अटकळ बांधत वाचण्यापाशीच तो दीर्घकाळ अडकतो.
10.भावना आणि बोध या दोहोंशी जोडलेले घटक वाचनात अंतर्भूत असतात. वाचनाकडे बघण्याची वाचकाची दृष्टी, त्याच्या घरी, संस्कृतीत आणि शाळेत वाचनाकडे कसे पाहिले जाते यावर अवलंबून असते. मजकुराशी सर्वार्थाने भिडणे हे प्रत्येक टप्प्यावर घडायला हवे – मजकुराचा आशय, त्यातले विचार आणि त्यातली मूल्ये, प्रेरणा, ऊर्जा, साहस आणि धैर्य यांचाही विचार वाचनाच्या परिपूर्ण विकासाच्या संदर्भात करणे आवश्यक आहे.
टप्प्यांसाठी पुढे दिलेल्या वयोगटात देश, संस्कृती, सामाजिक पार्श्वभूमी यानुसार बदल होऊ शकतात.
शून्यावा टप्पा : वाचनपूर्व टप्पा  (जन्मापासून सहाव्या वर्षांपर्यंत)
हा टप्पा सर्वात दीर्घ आहे. सर्वाधिक बदलही याच टप्प्यात होतात. साक्षर संस्कृतीत वाढणार्‍या मुलांना जन्मल्यापासून ते शाळेत जाईपर्यंतच्या कालावधीत लिहिणे, अक्षरे, शब्द, पुस्तके याबद्दलचे खूपसे ज्ञान मिळते. वाक्यरचना आणि शब्द अशा वेगवेगळ्या भाषिक अंगांवर प्रभुत्तव मिळवत मुले मोठी होतात. शब्दांविषयी मर्मदृष्टीही मुलांना येते – काही शब्द त्याच अक्षराने सुरू होतात, काही शब्द त्याच अक्षराने संपतात. (अनुप्रास आणि यमक)
संशोधनांमधून पुढील गोष्टी लक्षात आल्या आहेत – मुळाक्षरामधला फरक मुलांना या वयात ओळखता येतो. बर्‍याचशा मुळांक्षरांची नावे मुले या वयात सांगू शकतात. काही अक्षरे किंवा स्वतःचे नाव काही मुलांना कागदावर उमटवता येते. रस्त्यांची नेहमीची नावे किंवा टी.व्ही. वरच्या जाहिरातीतील उत्पादकांची नवे ही मुले ओळखू शकतात. आपल्या आवडत्या पुस्तकातले काही शब्द मुले वाचू शकतात. ‘अक्षरांशी साधर्म्य असलेले आकार’ आणि ‘लिहिलेले’ यातून लिहिलेले कोणते हे या वयाची बरीच मुले ओळखतात. एखादे पुस्तक मुले “खोटे खोटे” वाचतात असेही या वयात आढळते. वाचल्यासारखे करीत या वयाची मुले गोष्टीतले तपशीलही सांगतात, वेळोवेळी पानही उलटतात !
वाचनपूर्व टप्प्यात मिळवलेले ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता यांचा पहिल्या टप्प्यातील वाचनाच्या यशाशी फार जवळचा संबंध आहे.
मुलाची व्यक्तिगत वैशिष्ट्ये आणि त्याते वातावरण या दोन्ही घटकांचा वाचता येण्याशी घनिष्ठ संबंध आहे. म्हणून घरी, तसेच शाळेत वाचनाला पूरक वातावरण कसे तयार करता येईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.
पहिला टप्पा : वाचनाचा आरंभ ‘डी-कोडींग’ अथवा लिपिचिन्हे ओळखणे(वय ६ वर्षे ते ७ वर्षे)
बोलल्या जाणार्‍या शब्दांशी, विशिष्ट लिपिचिन्हांत बद्ध असलेल्या आकारांची जोडणी होणे ही महत्त्वाची गोष्ट या टप्प्यात घडते. मुळाक्षरयुक्त लिपीचे ज्ञान मूल या टप्प्यात मिळते. त्यासाठी अमूर्ताची समज चांगली असावी लागते. शब्द विशिष्ट आवाजांचा बनलेला असतो, हे या वयात उमजते.
काही मुलांच्या बाबतीत अमूर्त चिन्हांपर्यंतचा प्रवास सहज, आनंदाचा ठरतो, तर या टप्प्यातील बरीच मुले जरी ठराविक मजकूर/शब्द, तसेच वाचतात असे दिसले, तरी ‘वाचना’बाबतची त्यांची समज वेगवेगळी असते. ती समज मोजण्याच्या पद्धतींचा शोध घेणे आवश्यक आहे.
१९७० च्या सुमारास झालेल्या एक संशोधनात असे आढळले, की साईट-वर्ड मेथड या ‘पाहून शब्द ओळखणे’ या पद्धतीने असे आढळले, की साईट-वर्ड-मेथड या ‘पाहून शब्द ओळखणे’ या पद्धतीने वाचन करायला शिकणार्‍या मुलांच्या बाबतीत पुढे पुढे चुका जास्त होताना दिसतात. शब्द कठिण होत गेले की मुले ते वाचू शकत नाहीत, किंवा एकाच्या जागी मुले दुसराच शब्द वाचतात.
या टप्प्यात केवळ नजरेने शब्द ओळखण्यापाशी न थांबता त्यातील घटकही मुलाल ओळखता यायला हवेत. मात्र घटक ओळखण्यापाशीच न अडकता शब्दातून व्यक्त होणार्‍या अर्थापर्यंतही पोहोचायला हवे. “खोट्या-खोट्या” वाचनाच्या टप्प्यातून आता मुलांनी पूर्णपणे बाहेर पडायला हवे. पुढे परिपक्व वाचनापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आत्ता प्रत्येक लिपिचिन्ह वाचणे गरजेचे ठरते. लिपिचिन्हांबाबतचे इतके ज्ञान त्यांना व्हायला हवे, की ती त्यापलिकडे जाऊ शकतील.
दुसरा टप्पा : लिपीचिन्हांच्या पुढे जाऊन ओघवते वाचन ; दृढीकरण (७ वय वर्षे ते ८ वर्षे)
पहिल्या टप्प्यात जे कमावले त्याचे दुसर्‍या टप्प्यात दृढीकरण होते. या टप्प्यात नवी माहिती मिळवली जात नाही, तर आधीचेच पक्के होते. तसेच, संदर्भाचा उपयोग करून त्याच्या मदतीने वाचनाचा वेग आणि ओघ वाढावायलाही मुले याच काळात शिकतात.
या टप्प्याबाबत आणि तिसर्‍या टप्प्याबाबत केलेल्या संशोधनात्मक कामामध्ये जमा केलेल्या माहितीवरून असे लक्षात येते, की तिसर्‍या टप्प्याअखेर मुलांचे वाचनातील गुण जर किमान पातळीच्या बरेच खालचे असतील, तर अशा मुलांना संपूर्ण शालेय आयुष्यात वाचनाचा प्रश्न भेडसावतो.
दुसर्‍या टप्प्यात वाचनात यश मिळण्यासाठी कशा प्रकारचे वातावरण हवे ? परिचित विषय, गोष्टी, परिचित वाक्यरचना, परिचित पिरकथा, पुराणकथा यांची पुस्तके मुलांना मोठ्या प्रमाणावर वाचायला मिळयला हवीत.
निम्नसामाजिक-आर्थिक स्तरातल्या मुलांमध्ये आणि इतर मुलांमधे या टप्प्यावर अंतर वाढताना दिसते. पुस्तके विकत घेणे, अशा मुलांच्या पालकांना परवडत नाही, वाचनालयातून पुस्तके वा नियतकालिक आणणे हाही यांच्या नित्यक्रमाचा भाग नसतो. अशी मुले सरावापासून वंचित राहतात. पालक मुलांना नेमाने वाचून दाखवत नसतील तर भाषाविकासाचा वेग मंदावतो.
तिसरा टप्पा : नवे काहीतरी शिकण्यासाठी वाचन-पहिली पायरी(वय ९ ते १४ वर्षे)
या टप्प्यात, नवीन माहिती, नवीन ज्ञान, नवे अनुभव, नवीन विचार मिळवण्यासाठी मूल वाचते. मुलांच्या बोधविषयक क्षमता, शब्दसंग्रह, ज्ञान अजूनही मर्यादित असल्यामुळे, खास बनवलेले, कमी गुंतागुंतीचे, विशिष्ट हेतू साध्य करणारे वाचनसाहित्य या टप्प्यात वापरणे श्रेयस्कर ठरते.
पारंपारिक शब्दात सांगायचे तर प्राथमिक टप्प्यांवर मुल ‘वाचायला शिकतात’ नंतर माध्यमिक शाळेत ‘शिकण्यासाठी वाचतात.’
पहिल्या दोन टप्प्यांमध्ये उच्चारांचे, बोलण्याचे लिपिचिन्हांशी, लिखित मजकुराशी असलेले नाते महत्त्वाचे ठरते, तर तिसर्‍या टप्प्यात लिखित मजकुराचे त्यातील विचारांशी आणि कल्पनांशी असणारे नाते महत्त्वाचे ठरते.
ऐकण्यातून, पाहण्यातून मूल जगाविषयी जे शिकते, त्या तुलनेत या टप्प्यावरील वाचनातून मुलाला जगाबद्दल जे समजते ते अत्यल्प असेत.
चौथा टप्पा : विविध दृष्टिकोण (वय १४ वर्षें ते १८ वर्षे)
विविध दृष्टिकोण समजून घेणे, त्यांची हाताळणी करणे हे चौथ्या टप्प्याशी जोडून येते. संकल्पनांच्या विविध स्तरांशी, वास्तवाच्या विविध पदरांशी भिडणे या टप्प्यात अंतर्भूत केली आहे असा मजकूर या टप्प्यात विद्यार्थी वाचू लागतात. मुक्त अवांतर वाचन वर्तमानपत्रांचे आणि नियतकालिकांचे वाचन, या सर्वांची जोड पाठ्यपुस्तकांच्या वाचनाला मिळणे या टप्प्यावर महत्त्वाचे ठरते. औपचारिक शिक्षणाची भूमिक या संदर्भात कळीची ठरते.
पाचवा टप्पा : रचना आणि पुनर्रचना : वैश्विक दृष्टिकोण (वय १८ वर्षांपुढे)
हेतूनुसार तपशिलात शिरून शेवटापासून, मधून वा सुरुवातीपासून, लेख आणि पुस्तके वाचायला या टप्प्यात माणूस शिकतो. काय वाचायचे हे तर तो शिकतोच, परंतु काय वाचायचे नाही याबाबतची त्याची समजही या टप्प्यात विकसित होते. आपल्या गरजेप्रमाणे आणि रुचीप्रमाणे वाचन करणे म्हणजेच पाचवा टप्पा गाठणे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तीही पाचवा टप्पा गाठतात किंवा कसे हे अभ्यासाचा विषय होईल.
इतरांना काय म्हणायचे आहे हे वाचनातून समजून घेऊन, वाचक स्वतःसाठी स्वतःच्या अशा ज्ञानाची रचना करीत जातो. काय आणि किती वाचायचे, किती वेगाने वाचायचे, किती तपशीलात वाचायचे हे वाचक ठरवतो. वाचनातून समजलेला विचार, त्याचे विश्लेषण आणि आपला त्याबाबतचा विचार या सगळ्यांचे संतुलन साधण्याची धडपड या टप्प्यात केली जाते.
उच्च पातळीवरील अमूर्त आणि सामान्य अशा ज्ञानाची निर्मिती; इतरांचे ‘सत्य’ समजून घेऊन स्वतःच्या ‘सत्या’ची निर्मिती या टप्प्यावर केली जाते.

Saturday 3 October 2015

भाषिक खेळ

१)-
समान अर्थ व जोडशब्दांची ओळख.
हा खेळ कितीही मुलांमध्ये खेळता येईल.
खाली काही शब्दांच्या जोडया दिलेल्या आहेत
यातील प्रत्येक शब्दाचा असा समान अर्थ शोधा
की त्या जोडीपासून नवीनच एक जोडशब्द तयार होईल .
उदा.-झोपडी+दरवाजा बरोबर घरदार होते.
झोपडी म्हणजे घर व
दरवाजा म्हणजे दार.
1.फायदा+नुकसान
2.वडील+मुलगा
3.विवाह+काम
4.दिनांक+दिवस
5.शरीर+शिक्षा
7.राहणे+घर
याप्रकारे शब्दांच्या जोडया देऊन खेळ घेता
येतो.
उत्तरे-1.नफातोटा
2.बापलोक
3.लग्नकार्य
4.तारीखवार
5.देहदंड
6.वसतिगृह.

२)

खाली विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देणे, सगळी उत्तरे एका शब्दात आणि मराठीमध्ये असावीत …. पण त्या
शब्दांमध्ये काना, मात्रा, उकार, वेलांटी असू
नये.. अवधि – 1तास

उदाहरणार्थ :
मुलाचे नाव – मदन
१) गावाच नाव
२) मुलीचं नाव
३) आडनाव
४) धातू
५) रंग
६) गोड पदार्थ
७) वस्तू
८) पूजा साहित्य
९) दागिना
१०) हत्यार
११) पक्षी
१२) प्राणी

Saturday 26 September 2015

ज्ञानरचनावाद

ज्ञानरचनावाद

रचनावादी अध्ययन व अध्यापनासाठी सध्या संपुर्ण महाराष्ट्रा मध्ये सातारा जिल्ह्यातील कुमटे बीट पँटर्न गाजताेय सन २०१५ १६ प्रयाेगीक तत्वावर काही शाळा मध्ये हा प्रकल्प राबवीला जाणार आहे माझी शाळा त्यासाठी निवडली असुन त्याबाबत नुकतेच सातारा येथे प्रशिक्षण झाले त्यामध्ये प्रत्येक विषय कसा शिकवावा व मुलांना शिक्षकांनी  शिकवण्याची गरज नसुन मुल निसर्गता शिकते फक्त शिकण्यासाठी याेग्य वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे असे रचनावाद सांगताे कुमठे बीटामध्ये गेली तीन वर्ष ही अध्यापन पध्दती राबवली असुन ३९ शाळामध्ये १ही विद्यार्थी अप्रगत नाही …

ज्ञानरचनावाद म्हणजे काय ???

१)भराडेमॅडम= यांनी pptच्या सहाय्याने मेंदु शिकण्याचा अवयव आहे.शरीराच्या २% वजन असणार्‍या मेंदुस २०% प्राणवायु लागतो.मेंदु वाढ गर्भात ७०%,पहिल्या वर्षी १५%,तीन वर्षात १०%,बारा वर्षात ५%होते.जन्मतः१००अब्ज मज्जापेशी मेंदुत असतात.शिकणे नैसर्गिक आहे.सुखद अनुभवांनी मज्जापेशींना फुटवे फुटतात तर दुःखद अनुभवांनी मज्जापेशी नष्ट होतात.मुलास तु चांगला आहेस गोड आहेस असे प्रबलन देत रहाणे मेंदुविकासास महत्वाचे आहे.आपण वर्तनवादी पध्दतीचे गुलाम आहोत.गणित सोडवण्याच्या पध्दती सांगु नये मुलांनी शोधायला हवे.मुलांस भीती वाटते तेव्हा न्युरोकार्टिक्सकडुन भावनिककडे प्राणवायु पुरवठा होतो खंडित पुरवठा सतत होणारी मुले उपद्रवी बनतात.मुलांस आनंददायी वातावरणात शिक्षण चांगले होते.

इंग्रजी भाषा
instruction 400अर्थासह संग्रहित केल्या.रोज १०सुचना देणे.Genral question 150 संकलित केले परिपाठावेळी 5प्रश्न विचारणे.तसेच Myselfप्रमाणेMy friend My School  My Teacher घेणे.स्वयंअध्ययनकार्ड flashcard रोज 5 घेणे.dictionary मधुन शब्द शोधण्याचा खेळ घेणे.नेटवरुन भरपुर rhymes घेणे.word puzzelsवone word     one sentence   one question  असा शब्दावरुन वाक्य सांगणे प्रश्न तयार करणे.अशा गोष्टी सातत्याने घेणे.

वर्गतयारी  मार्चपासुन पहिली वर्ग सुरु मुले खेळण्यात रमतात.सोपी बडबडगीते घेतो.
उपक्रम=१)मोठ्या चित्रांची पुस्तके पहाणे चित्रवर्णन करणे.२)चित्रगप्पा मारणे३)आठवड्यातुन एकदा ठरवुन गप्पा मारणे.४) न ठरवता गप्पा मारणे.५)वाचनासाठी चित्रशब्दवाचनएकत्र नंतर फक्त चित्रवाचन व नंतर फक्त शब्दवाचन = पाचचित्रकार्डसंच लागोपाठ दोन दिवस द्यावेत.संयम ठेवावा.६)चित्राशी शब्द जोड्या लावणे खेळ घेणे.प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र संच हवा.
हिमोग्लोबीन कमतरतेचा मेंदुवर बौध्दीक क्षमतेवर परिणाम होतो.यासाठी कुमठे बीटात सर्व शाळांत सेंद्रियशेती केली जाते कसदार माती बनवली जाते त्यातील भाज्या शालेय पोषण आहार टाकल्या जातात.
मराठी विषय. शाळा मुलांसाठी आहेत अधिकारी आलेतरी मुले कामांत मग्न असतात.सप्टेंबरपर्यंत मुले वाचु लागतात.
उपक्रम=१)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे.
२)शब्दभेंड्या खेळ घेणे.३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.
लेखनाचे उपक्रम १)धुळपाटीवर लेखन २)हवेत अक्षर गिरविणे.३)समान अक्षर जोड्या लावणे.४)अक्षर आगगाडी बनवणे.५)पाहुणा अक्षर ओळखणे.६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.७)बाराखडीवाचन करणे.८)बाराखडीतक्तेवाचन करणे.९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.११)कथालेखन करणे.१२)कवितालेखन करणे.१३)चिठठीलेखन करणे.१४)संवादलेखन करणे.१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.

गणित १)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे२)वर्गातील वस्तु मोजणे३)अवयव मोजणे४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.६)आगगाडी तयार करणे७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.९)अंकाची गोष्ट सांगणे.१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे १२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.१३)बेरीजगाडी तयार करणे.१४)अंकांपुढे वस्तु मांडणे १५)गठ्ठे सुट्टे सांगणे१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे.
ज्ञानरचनावाद दूतांसाठी खास+++

वाचन म्हणजे फक्त अक्षरांचे उच्चार करणे नाही.
वाचन म्हणजे सांकेतिक चिन्हांच्या आधारे शब्दांचा उच्चार करुन शब्दात दडलेला अर्थ समजून घेणे म्हणजेच लिखित मजकुराचा अर्थ कळणे आहे.

वाचन पुर्वतयारी—

१)नजरेने आकारातील साम्यभेद ओळखणे.
२)डावीकडुन उजवीकडे नजर फिरविण्याचा सराव.
३)बोललेले शब्द डावीकडुन उजवीकडे लिहिले जातात समजणे.
४)दृश्य शब्दसंग्रह=उपक्रम.

१)मुलांची हाती त्यांच्या नामपटट्या द्या व दुसर्‍या संचातील पट्टी तशीच शोधणेस सांगा. मुले स्वतःचे व इतराचे नाव चार दिवसात ओळखण्यास वाचण्यास शिकेल.

२.) वर्गातील वस्तुवर नावाच्या चिठठ्या लावा. दुसरा संचातील चिठ्ठी मुलास द्या. तुझ्या चिठ्ठीवर कोणते नाव लिहिले आहे शोधुन काढणेस सांगणे.
सांगीतलेल्या नावाची चिठ्ठी दाखवणेस.

३.)परिचयाच्या चित्रांचा वापर करुन पुढील खेळ घेणे.
सलग तीन दिवस मुलांना चित्रशब्दकार्ड वाचन घ्या नंतर चित्राखाली बोट ठेवुन नावाचे वाचन घ्या. सर्वांस शब्दकार्ड वाटा.व एकच चित्रकार्ड दाखवुन याचे नाव कोणाकडे आहे त्याला पुढे बोलवा. चित्रशब्दकार्डाखाली लावुन खात्री करु द्या.अशीच सर्व चित्रशब्दकार्ड शोधण्याचा सराव घेणे.
पुढील तीन दिवस शब्दकार्डाची शब्दकार्डाशी जोड्या लावणे खेळ घेणे.
पुढील तीन दिवस शब्दकार्डाची चित्रकार्डाशी जोडी लावणे.

४) दहा शब्द झाले की, वाक्यवाचन सुरु करावे. हा आंबा(चित्र)आहे वाचन करणे. नंतर चित्राजागेवर शब्द ठेवुन वाक्य वाचनाचा सराव घेणे.
दृकशब्दसंपत्ती वाढ ४० पर्यंत जाणे ही वाचनपुर्वतयारी झाली.इथपर्यंत मुले अंदाजाने वाचतात पुर्ण शब्द वाचतात.पण हे प्रत्यक्ष वाचन नव्हे. प्रत्यक्षवाचनासाठी मुले शब्दाचा एकत्रित विचार करतात व वाचन सुलभ होते.
अक्षर परिचय कसा शिकवावा?
अक्षरे ध्वनींची चिन्हे आहेत समजा क शिकवायचा आहे तर क ऐकवा म्हणुन घ्या व क आवाजाचे शब्द विचारा ते फळ्यावर लिहा. आता ठसठशीत मोठा क दाखवुन हा क असा लिहीतात दाखवा. आता क त्यांनी सांगीतलेल्या शब्दांत कुठे आहे शोधण्यास सांगा.
गृहपाठ=वर्तमानपत्रातील क कापुन आणणे.
अक्षर दृढीकरणासाठी हवेत अक्षर गिरवणे घ्या,जमीनीवर अक्षरे लिहुन त्यावर खडे चिंचोके मणी ठेवण्यास सांगा.कधी नुसत्याच वस्तु देवुन अक्षर बनवणेस सांगा.परिचित शब्द बनवता येतील असे अक्षरगट प्राधान्याने शिकवा ६ अक्षरे शिकुन झाली की त्यापासुन शब्द बनवणेचा खेळ घ्या.

दृश्यवाचनाने परिचित शब्दांपासुन अक्षरे वेगळी करुन ती उलटसुलट क्रमाने ठेवुन शब्द बनवणे खेळ घेणे.

स्वरचिन्ह परिचय-

पाच सहा अक्षरे शिकवुन झाली की एका स्वरचिन्हाचा परिचय करुन देणे.
स्वरचिन्हे खुणा आहेत काना मात्रा वेलांटी न शिकवता आ ए ई उच्चार लक्षात रहाणे महत्वाचे आहे.कान्याला आ व मात्रेला ए म्हणावे.मुलांना येणार्‍या अक्षरास स्वरचिन्ह जोडुन होणारा उच्चार करणेचा सराव घेणे.अक्षर परिचय चालु असताना टप्प्याने सर्व स्वरचिन्ह परिचय करुन द्यावा.

वाक्यवाचन—

मुले शब्द तयार करु लागली की छोट्या वाक्याची पुस्तके वाचण्यास द्यावीत. प्रत्येक पानावर चित्र व एक वाक्य  सहा वाक्याचे पुस्तक बनवणे.जमतील तशी चित्रे काढावीत. मुलांचा वाचनाचा आत्मविश्वास वाढत जाईल.

जोडाक्षराचे वाचन—

एकच प्रकारचे जोडाक्षर शब्द मोठ्याने वाचुन मुलांसमोर ठेवावा.कात्रीने अक्षर जोडणी कापुन दोन्हीचे उच्चार करुन दाखवावेत.जोडाक्षर बनविणे नंतर सारख्या जोडाक्षरी शब्दवाचनाचा सराव घेणे.
र चे चार प्रकार शिकवणे.

परिच्छेद आकलन—

दैनंदिन कामावरील परिच्छेद वाचणे.त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहिणे.

प्रकटवाचन—

योग्य ठिकाणी विराम घेणे व योग्य स्वराघातासह वाचन करणे महत्वाचे.शिक्षकांनी उतारा वाचुन दाखवावा. शिक्षकांमागोमाग एक एक वाक्य विद्यार्थी वाचतील. पुन्हा पुर्ण उतारा विद्यार्थी योग्य विराम व स्वराघातासह वाचतील.
वाचनसाहित्य भरपुर हवे.

परिच्छेदवाचन—

शब्द डोंगर वाचन घेणे. अधिक शब्दांचे वाक्य वाचुन आकलन होणे महत्वाचे आहे.