Sunday, 31 August 2014

4

[प्र.१] राजा या शब्दाला पर्यायी शब्द नसलेला शब्द ओळखा.
१] भूपती
२] भूर्ज
३] भूपाळ
४] भूप


उत्तर
----------------
[प्र.२] 'थंड फराळ करणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
१] थंड अन्न खाणे
२] भरपूर जेवणे
३] उपाशी रहाणे
४] सावकाश जेवणे

उत्तर
----------------
 [प्र.३] मनस्ताप हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
१] पूर्वरूप संधी
२] पररूप संधी
३] व्यंजन संधी
४] विसर्ग संधी

उत्तर
----------------
[प्र.४] 'वहाने सावकाश चालवा.' - या वाक्यातील सावकाश या शब्दाचा प्रकार ओळखा.
१] क्रियाविशेषण
२] विशेषण
३] उभयान्वयी अव्यय
४] क्रियापद

उत्तर
----------------
[प्र.५] 'मधु पुस्तक वाचतो.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
१] कर्तरी प्रयोग
२] कर्मणी प्रयोग
३] नवीन कर्तरी प्रयोग
४] भावे प्रयोग

उत्तर
----------------
[प्र.६] सर्व समाजात समता असावी असे म्हणणा-या व्यक्तीला _ _ _ _ _ _ _ म्हणतात.
१] सर्वजनवादी व्यक्ती
२] सौम्यवादी व्यक्ती
३] साम्यवादी व्यक्ती
४] समतोलवादी व्यक्ती

उत्तर
----------------
[प्र.७] 'चित्रा आधी जेवली कारण तिला भूक लागली होती.' - या वाक्याचा प्रकार ओळखा.
१] केवळ वाक्य
२] मिश्र वाक्य
३] संयुक्त वाक्य
४] विधानार्थी वाक्य


उत्तर
----------------
[प्र.८] 'शार्दुल' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
१] सिंह
२] हरीण
३] शहामृग
४] हत्ती

उत्तर
----------------
[प्र.९] 'साहस हे जीवनामध्ये मिठासारखे आहे.' या वाक्यातील साहस हे _ _ _ _ _ _ _ आहे.
१] सामान्यनाम
२] विशेषनाम
३] भाववाचक नाम
४] सर्वनाम


उत्तर
----------------
[प्र.१०] जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा.....
१] निरक्षर
२] अशिक्षित
३] सनातनी
४] अंधश्रद्धाळू

3

[प्र.१] आजोबांबद्दल पुढीलपैकी कोणते विधान निश्चित खरे असेल?
१] त्यांना एक मुलगा व मुलगी असेल.
२] त्यांचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त असेल.
३] त्यांचे केस पांढरे असतील.
४] त्यांना नात अथवा नातू असेल.


-------------------------------------------------------------
[प्र.२] पुढीलपैकी कोणती दोन विधाने सोने हे चांदीपेक्षा जड आहे हा निष्कर्ष काढण्यासाठी उपयुक्त आहेत?
अ] चांदी जस्तापेक्षा जड आहे.
ब] सोने शिशापेक्षा जड आहे.
क] शिसे चांदीपेक्षा जड आहे.
ड] लोखंड सोन्यापेक्षा हलके आहे.
१] ब आणि ड
२] क आणि ड
३] ब आणि क
३] अ आणि क


-------------------------------------------------------------
[प्र.३] खाली दोन विधाने दिली आहेत त्यावरून दोन निष्कर्ष काढलेले आहेत. विधानातील माहिती खरी आहे असे समजून कोणते निष्कर्ष योग्य आहेत ते सांगा.
विधान १] सर्व दिवे खांब आहेत.
विधान २] सर्व खांब दार आहेत.
निष्कर्ष अ] कोणतेही दार दिवे नाहीत.
निष्कर्ष ब] काही खांब दिवे आहेत.
पर्याय
१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य
४] कोणतेही योग्य नाही
  

-------------------------------------------------------------
[प्र.४] रामचे वडील म्हणतात त्यांना तीन मुले आहेत. राम म्हणतो मला दोन भाऊ आहेत.तर कोणाचे म्हणणे चुकीचे आहे?
१] रामच्या वडिलांचे
२] रामचे
३] दोघांचे
४] कोणाचेही नाही


 -------------------------------------------------------------
[प्र.५] लढाई करण्यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट कोणती?
१] हत्यारे
२] सैनिक
३] शत्रू
४] रणांगण


-------------------------------------------------------------
[प्र.६] शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, "त्याचे वडील माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे आहेत." तर त्या स्त्रीचे त्या व्यक्तीशी नाते काय?
१] सून-सासरा
२] सासू-जावई
३] नवरा-बायको
४] भाऊ-बहिण


-------------------------------------------------------------
[प्र.७] अ या गावाहून ब या गावी जायला ४ रस्ते आहेत आणि ब या गावाहून क या गावी जायला ५ रस्ते आहेत तर अ या गावाहून क या गावी जायला वेगवेगळे किती रस्ते आहेत?
१] २०
२] ९
३] १०
४] ४०

-------------------------------------------------------------
[प्र.८] खाली दोन विधाने दिली आहेत त्यावरून दोन निष्कर्ष काढलेले आहेत. विधानातील माहिती खरी आहे असे समजून कोणते निष्कर्ष योग्य आहेत ते सांगा.
विधान १] सर्व चिकू पेरू आहेत.
विधान २] सर्व डाळिंब हे पेरू नाहीत.
निष्कर्ष अ] सर्व डाळिंब चिकू आहेत.
निष्कर्ष ब] काही डाळिंब चिकू आहेत.
पर्याय
१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य
४] कोणतेही योग्य नाही


-------------------------------------------------------------
[प्र.९] परवा सोमवार होता. काल जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. आज हवामान ढगाळ आहे. हि तिन्ही विधाने सत्य असल्यास पुढीलपैकी कोणते विधान निश्चित सत्य असेल?
१] उद्या पाऊस पडेल.
२] रविवारी पाऊस पडला नाही.
३] मंगळवारी पाऊस पडला.
४] सोमवारी हवा स्वच्छ होती.


-------------------------------------------------------------
[प्र.१०] रमेश हा रश्मीचा भाऊ व सुशांत हा रश्मीचा मुलगा आहे. वाणी हि विनिताचि मुलगी आहे. विनिता रश्मीची बहिण आहे. तर वाणी हि सुशांतची कोण?
१] भाची
२] मुलगी
३] आत्या
४] मावस बहिण

2

[प्र.१] महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला?
१] लतिका घोष
२] सरोजिनी नायडू
३] कृष्णाबाई राव
४] उर्मिला देवी


-------------------------------------------------------------
[प्र.२] पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले?
१] अक्स-ला-चॅपेलचा तह
२] पॉंडेचेरीचा तह
३] मँगलोरचा तह
४] पॅरिसचा तह


-------------------------------------------------------------
[प्र.३] १८५७च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता?
१] खान बहादूर खान
२] कुंवरसिंग
३] मौलवी अहमदुल्ला
४] रावसाहेब


-------------------------------------------------------------
[प्र.४] डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केले?
१] १८४९
२] १८५१
३] १८५३
४] १८५४


 -------------------------------------------------------------
[प्र.५] १९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केले?
१] फ्री इंडिया
२] नया भारत
३] फ्री प्रेस जर्नल
४] लीडर


-------------------------------------------------------------
[प्र.६] १८५७च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा.

अ] उठावकर्त्यांना विशिष्ठ राजकीय उद्दिष्ट नव्हते.
ब] झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] वरीलपैकी एकही नाही


-------------------------------------------------------------
[प्र.७] खाली दिलेल्या भारताच्या व्हॉइसरॉय यांचा योग्य कालक्रम लावा.
अ] लॉर्ड कर्झन
ब] लॉर्ड चेम्सफर्ड
क] लॉर्ड हार्डिंग्स II
ड] लॉर्ड आयर्विन

पर्याय
१] अ-ब-क-ड
२] अ-क-ब-ड
३] क-अ-ब-ड
४] अ-ड-क-ब


-------------------------------------------------------------
[प्र.८] विधान अ] १९२९ चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे.
स्पष्टीकरण ब] उमा शंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदेमंडळात मांडला.

पर्याय:
१] फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
२] फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
३] अ बरोबर आणि ब चूक
४] अ चूक आणि ब बरोबर


-------------------------------------------------------------
[प्र.९] कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले?
१] भारत सरकारचा कायदा १९३५
२] भारत सरकारचा कायदा १९१९
३] भारत कौन्सिल कायदा १९०९
४] भारत कौन्सिल कायदा १८९२


-------------------------------------------------------------
[प्र.१०] विधान अ] १९३९च्या त्रिपुरा अधिवेशनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत सुभाषचंद्र बोस यांनी सितारामय्या यांचा पराभव केला.
स्पष्टीकरण ब] सितारामय्या यांना निवडणुकीत महात्मा गांधींचा पाठींबा होता.    

पर्याय:
१] फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे,
२] फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
३] अ बरोबर आणि ब चूक
४] अ चूक आणि ब बरोबर

प्रश्नसंच १

प्रश्नसंच १ - [भूगोल]

---------------------------------------------------
[प्र.१] महाराष्ट्रात सुपारीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते?
१] रायगड
२] रत्नागिरी
३] सिंधुदुर्ग
४] ठाणे


-------------------------------------------------------------
[प्र.२] सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
१] झेलम
२] रावी
३] चिनाब
४] बियास


-------------------------------------------------------------
[प्र.३] भारतातील पहिला रेयॉन प्रकल्प १९५० साली कोणत्या राज्यात उभारला गेला?
१] उत्तर प्रदेश
२] केरळ
३] तामिळनाडू
४] महाराष्ट्र


-------------------------------------------------------------
[प्र.४] देशातील सर्वात मोठे सुती वस्त्रोत्पादक राज्य कोणते?
१] महाराष्ट्र
२] गुजरात
३] पश्चिम बंगाल
४] केरळ


 -------------------------------------------------------------
[प्र.५] कोणत्या नदीला ट्रान्स हिमालयीन नदी असेही संबोधले जाते?
१] गंगा
२] सतलज
३] सियाचिन ग्लेशियर
४] सिंधू


-------------------------------------------------------------
[प्र.६] खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा.

अ] एकाच प्रकारचे खडक व त्यांची समान रचना असलेल्या भागात वृक्षाकार जलप्रणाली आढळते.
ब] जेथे मुख्य नदीला उपनद्या काटकोनात मिळतात तेथे आयताकार जलप्रणाली आढळते.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] वरीलपैकी एकही नाही


-------------------------------------------------------------
[प्र.७] खालील वने [गट १] आणि त्या संबंधित पर्जन्य प्रमाण [गट २] यांच्या योग्य जोड्या लावा.

[गट १]
अ] मान्सून वने.
ब] उष्ण कटिबंधीय सदाहरित वने.
क] उष्ण कटिबंधीय आद्र पानझडी वने.

[गट २] (सेमी)
I] २०१-२५०
II] २५१-३००
III] १०१-२००

पर्याय
१] अ-I, ब-II, क-III
२] अ-III, ब-II, क-I
३] अ-III, ब-I, क-II
४] अ-II, ब-I, क-III


-------------------------------------------------------------
[प्र.८] खालील विधाने लक्षात घ्या व अयोग्य विधाने ओळखा.

अ] मारवाड पठार खनिज समृद्ध आहे.
ब] द्वीपकल्पीय भारतात भूकंप होत नाहीत.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] वरीलपैकी एकही नाही


-------------------------------------------------------------
[प्र.९] खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा.

अ] बंगळूरला मंगलोरपेक्षा अधिक पाऊस पडतो.
ब] बंगळूरला नैऋत्य मौसमी वारे व परतीच्या पावसाचा फायदा मिळतो.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] वरीलपैकी एकही नाही


-------------------------------------------------------------
[प्र.१०] विधान अ] उत्तर व वायव्य भारतात डिसेंबर-जानेवारी महिन्यात कधी कधी पाऊस पडतो.
स्पष्टीकरण ब] नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास हिवाळ्यात चालू होतो.

पर्याय:
१] फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे,
२] फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
३] अ बरोबर आणि ब चूक
४] अ चूक आणि ब बरोबर

Friday, 29 August 2014

[पंचायत राज]

  [पंचायत राज]

[प्र.१] रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
१] लॉर्ड मेयो
२] हॉब हाऊस
३] लॉर्ड रिपन
४] लॉर्ड लिटन

उत्तर
--------------------------------
[प्र.२] स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी पास केला?
१] लॉर्ड मेयो
२] हॉब हाऊस
३] लॉर्ड रिपन
४] लॉर्ड लिटन

उत्तर
--------------------------------
[प्र.३] ग्रामपंचायत सदस्यांना काय म्हणून संबोधले जाते?  
१] उपसरपंच
२] ग्रामसेवक
३] पंच
४] ग्रामसदस्य

उत्तर
--------------------------------
[प्र.४] ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आढळल्यास त्यासंबंधीचा ठराव ग्रामसभा कोणाकडे पाठवते?
१] विभागीय आयुक्त
२] राज्यशासन
३] जिल्हा परिषद स्थायी समिती
४] मुख्य कार्यकारी अधिकारी

उत्तर
--------------------------------
[प्र.५] सरपंच निवड बैठकीचा अध्यक्ष कोण असतो?
१] तहसीलदार
२] सरपंच
३] गटविकास अधिकारी
४] जेष्ठ पंच

उत्तर
--------------------------------
[प्र.६] भारतात सर्वाधिक ग्रामपंचायती असेलेल राज्य कोणते?
१] केरळ
२] महाराष्ट्र
३] उत्तर प्रदेश
४] मध्यप्रदेश

उत्तर
--------------------------------
[प्र.७] सरपंच आणि उपसरपंच यांच्या अनुपस्थितीत ग्रामसभा बोलाविण्याचा अधिकार कोणाला असतो?
१] जिल्हाधिकारी
२] गटविकास अधिकारी
३] तहसिलदार
४] उपमुख्य कार्यकारी अधिकारी

उत्तर
--------------------------------
[प्र.८] ग्रामपंचायत आपली संपत्ती कोणाच्या संमतीने ‘लीज’ वर देऊ शकते?
१] राज्यशासन
२] जिल्हा परिषद
३] मुख्य कार्यकारी अधिकारी
४] जिल्हाधिकारी

उत्तर
--------------------------------
[प्र.९] ग्रामपंचायतीसाठी पंचसूत्री योजना कोणी तयार केली?
१] महात्मा गांधी
२] जवाहरलाल नेहरू
३] आचार्य विनोबा भावे
४] बलवंतराय मेहता

उत्तर
--------------------------------
[प्र.१०] समुदाय विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी ग्रामपातळीवर कोणावर असते?
१] ग्रामसेवक
२] सरपंच
३] तलाठी
४] ग्रामपंचायत सभासद

उत्तर

gk2014

[प्र.१] सिएट सर्वोत्तम वनडे क्रिकेटर २०१३-१४ पुरस्कार कोणाला मिळाला?
१] विराट कोहली
२] शिखर धवन
३] मायकेल हसी
४] जॉर्ज बेली


उत्तर
----------------
[प्र.२] नरेंद्र मोदींच्या ४५ जणांच्या मंत्रिमंडळात किती महिलांचा समावेश आहे?
१] ११
२] १५
३] ७
४] ९

उत्तर
----------------
[प्र.३] जून २०१४ मध्ये मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
१] सुजाता सिंग
२] राजेश कुमार
३] राजीव माथुर
४] ब्रजेश कुमार

उत्तर
----------------
[प्र.४] ‘बोको हराम’ हि दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे?
१] इराक
२] नायजेरिया
३] इराण
४] अ आणि क दोन्ही

उत्तर
----------------
[प्र.५] केंद्र सरकारने गठीत केलेल्या ७व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली?
१] अशोक माथुर
२] मीना अग्रवाल
३] विवेक राय
४] रोपिन राय

उत्तर
----------------
[प्र.६] ‘सोलर इम्पल्स २’ ह्या सौर उर्जेवर चालणार्या स्वयंचलित विमानाची चाचणी नुकतीच कोणत्या देशात घेण्यात आली?
१] स्वित्झर्लंड
२] जर्मनी
३] अमेरिका
४] भारत

उत्तर
----------------
[प्र.७] २०१४ची हिंद केसरी स्पर्धा कोणी जिंकली?
१] संतोष वेताळ
२] अमोल बराटे
३] नरसिंह यादव  
४] देवेंद्र कुमार

उत्तर
----------------
[प्र.८] श्रीलंका खुली बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धा (महिला) कोणी जिंकली?
१] पी.व्ही.सिंधू
२] सायना नेहवाल
३] पी.सी.तुलसी
४] ज्वाला गुट्टा

उत्तर
----------------
[प्र.९] युनिसेफच्या अहवालानुसार बालकामगारांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो?
१] पहिला
२] तिसरा
३] पाचवा
४] आठवा

उत्तर
----------------
[प्र.१०] केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची राज्यसभेवर नुकतीच कोणत्या राज्यातून निवड झाली?
१] महाराष्ट्र
२] मध्यप्रदेश
३] गुजरात
४] राजस्थान

उत्तर

history1

[प्र.१] दादाभाई नौरोजी यांनी भारतीयांना कोणता संदेश दिला?
१] अखंड अभ्यास करा
२] घटनात्मक मार्ग स्वीकारा
३] वेदांकडे चला
४] अखंड चळवळ करा


उत्तर
--------------------------------
[प्र.२] हैदर अलीने आधुनिक तोफखाना कोठे तयार केला?
१] म्हैसूर
२] कलकत्ता
३] दिन्डीगल
४] आरकाट

उत्तर
--------------------------------
[प्र.३] इंग्रजांच्या अधिसत्तेला धोका असलेल्या फ्रेंचांची स्पर्धा कोणत्या युद्धाने संपुष्टात आली?  
१] वांदिवाश
२] बक्सार
३] श्रीरंगपट्टणम
४] प्लासी

उत्तर
--------------------------------
[प्र.४] १९३१ सालच्या कराची अधिवेशनासाठी मुलभूत हक्कांचा मसुदा कोणी तयार केला?
१] पंडित जवाहरलाल नेहरू
२] मोतीलाल नेहरू
३] बाबासाहेब आंबेडकर
४] महात्मा गांधी

उत्तर
--------------------------------
[प्र.५] १९३५ च्या कायद्यानुसार खालीलपैकी कोणत्या प्रांतात राष्ट्रीय सभेचे मंत्रिमंडळ नव्हते?
१] बिहार
२] ओरिसा
३] मद्रास
४] पंजाब

उत्तर
--------------------------------
[प्र.६] आझाद हिंद सेनेचा मानवंदनेचा व अभिवादनाचा मंत्र काय होता?
१] जय हिंद
२] जय भारत
३] चलो दिल्ली
४] जय जवान  

उत्तर
--------------------------------
[प्र.७] गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात भरली होती?
१] दिल्ली
२] लंडन
३] इडनबर्ग
४] कलकत्ता

उत्तर
--------------------------------
[प्र.८] पूर्ण स्वराज्य दिन कोणत्या दिवशी पाळण्यात आला?
१] २५ जानेवारी १९४७
२] २६ जानेवारी १९३०
३] १५ ऑगस्ट १९४७
४] १५ ऑगस्ट १९४२

उत्तर
--------------------------------
[प्र.९] आफ्रो-आशियायी देशांचे बाडुंग संमेलन केव्हा भरले?
१] १९८५
२] १९५५
३] १९५४
४] १९४९

उत्तर
--------------------------------
[प्र.१०] खालील घटना कालानुक्रमे लावा.
अ] दांडी यात्रा
ब] सायमन कमिशन
क] पुणे करार
ड] गांधी आयर्वि्न करार

१] अ-ब-क-ड
२] ड-क-ब-अ
३] ब-अ-क-ड
४] ब-अ-ड-क

उत्तर
--------------------