कविताmahazpschool.blogspot.in
(या ठिकाणी देण्यात आलेल्या कवितांचे गायन, संगीत चांगल्या प्रकारे देवून कवितांची निर्मिती करण्यात आलेली आहे. कवितांची निर्मिती कोणी केली हे माहित नसल्यामुळे त्यांचे नाव या ठिकाणी देता आलेले नाही. तरी कोणाला जर माहिती झाल्यास कमेंट बॉक्स मध्ये आवश्य सर्वांना माहित करुन दयावे .)
इयत्ता - 1 ली विषय - मराठी
1. पाऊस पडतो सरसर डाऊनलोड
2. धोंड-धोंड पाणी दे डाऊनलोड
3. एक होती भिंगरी डाऊनलोड
4. पॉल अंकिता गौरी डाऊनलोड
5. एक चिऊ आली डाऊनलोड
6. झुई-झुई झोका डाऊनलोड
8. ऊठ मुला डाऊनलोड
9. ऊन असो वारा असो डाऊनलोड
इयत्ता - 2 री . विषय - इंग्रजी
1. Ding dong bell डाऊनलोड
2. Head shoulder डाऊनलोड
3. Five potato wadas डाऊनलोड
4. Incy wincy spider डाऊनलोड
5. Tony tinker डाऊनलोड
6. Who are you डाऊनलोड
इयत्ता - 2 री . विषय - मराठी
1. गवताच पातं डाऊनलोड
2. जाऊ फुलांच्या जगात डाऊनलोड
3. फुलपाखरे डाऊनलोड
4. चैञ महिना डाऊनलोड
5. ध्वज उंच धरु डाऊनलोड
6. दोन पाय छोटे डाऊनलोड
7. झरझर आला वारा डाऊनलोड
8. थेंबा-थेंबा कोठून येतोस ? डाऊनलोड
9. चला गडयांनो खेळूया ... डाऊनलोड
इयत्ता - 3 री . विषय - मराठी
1. पोर डोंगरावर भाळली डाऊनलोड
2. पडघम वरती टिपरी पडली डाऊनलोड
3. झाडेच झाडे लावूया डाऊनलोड
4. ते देशासाठी लढले डाऊनलोड
5. हसा मुलांनो हसा डाऊनलोड
6. सुट्टीच्या दिवसांत वाटते डाऊनलोड
7. रानपाखरा रोज सकाळी डाऊनलोड
8. रानातल्या बोरीला डाऊनलोड
9. माझी एक गाय होती डाऊनलोड
10.ट्रॅफिक दादा सांगा सांगा डाऊनलोड
इयत्ता - 3 री . विषय - इंग्रजी
सर्व कविता डाऊनलोड
इयत्ता - 4 थी . विषय - मराठी
1. धरतीची आम्ही लेकरे डाऊनलोड
2. या भारतात बंधुभाव डाऊनलोड
3. असो बरकत धुळ पेरणीला डाऊनलोड
4. नाखवा दादा नाखवा दादा डाऊनलोड
5. चवदार तळयाचे पाणी डाऊनलोड
6. वाटते सानुली डाऊनलोड
7. नदीच्या शेजारी डाऊनलोड
8. पावसा रे पावसा रे डाऊनलोड
9. मना खांदेशनी माटी डाऊनलोड
इयत्ता - 6 वी विषय - इंग्रजी
सर्व कविता डाऊनलोड
टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा !
उंच उभारी दोन्ही कान
ऐटित वळवी मान-कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा !
घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इषारा, कशास चाबुक ओढा !
सात अरण्ये, समुद्र सात
ओलांडिल हा एक दमात
आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा !
- शांता शेळके
मन -----
मन वढाय वढाय
उभ्या पिकातल ढोर
किती हाकलं हाकलं
फिरी येते पिकावर
मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात
आता व्हत भुइवर
गेल गेल आभायात
मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन
उंडारल उंडारल
जस वारा वाहादन
मन जह्यरी जह्यरी
याच न्यार रे तन्तर
आरे इचू साप बरा
त्याले उतारे मन्तर
मन एव्हड एव्हड
जस खसखसच दान
मन केवढ केवढ
आभायतबि मावेन
देवा आस कस मन
आस कस रे घडल
कुठे जागेपनी तुले
अस सपन पडल
- बहीणाबाई चौधरी
फुलपांखरूं
फुलपांखरूं !
छान किती दिसतें । फुलपाखरूं
या वेलीवर । फुलांबरोबर
गोड किती हसतें । फुलपांखरूं
पंख चिमुकलें । निळेजांभळे
हालवुनी झुलतें । फुलपांखरूं
डोळे बरिक । करिती लुकलुक
गोल मणी जणुं ते । फुलपांखरूं
मी धरुं जाता । येई न हाता
दूरच तें उडते । फुलपांखरूं
- ग.ह.पाटील
गिरी शिखरावरूनी सोगे सुटले ढगांचे
ओले हिरवे दिवस येती जाती श्रावणा चे
ओल्याचिंब अवकाशी आर्त नाद पावशाचा
पान फूल होऊ पाहे कण कण मृत्तीकेचा
मिटे फुले डोंगरात फूल उन सावल्यांचे
स्वप्न दिवसाच्या डोळा तरळते चांदण्यांचे
विष्णुकांतीच्या फुलांच्या पसरल्या निळ्या राशी
सहस्राक्ष आन्थरितो नेत्र धरेच्या पायाशी
गवताच्या पात्यापरी भिजलेले माझे मन
इंद्रधनुष्याशी नाते जोडी तन्मय होऊन
(कवी - वा. रा. कांत)
(इयत्ता - पाचवी 1986)
मला वाटते बसुनी विमानी आकाशातून हिंडावे
किंवा सुंदर नौकेमधूनी समुद्रातूनी भटकावे
निळा निळा तो समोर डोंगर चढुनी वरती पहावे
राज्य तयांचे जाऊनी तेथे राज्य पदाते मिळवावे
परी भूमीवर संध्याकाळी छायाकळी जो धावे
तेव्हा वाटे सोडुनी सकळा निज मातेला बिलगावे
No comments:
Post a Comment