Sunday, 14 September 2014

मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे


  • कृष्णाजी केशव दामले – केशवसुत 
  • गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर
  • प्रल्हाद केशव अत्रे – केशवकुमार
  • राम गणेश गडकरी – गोविंदाग्रज
  • विष्णू वामन शिरवाडकर – कुसुमाग्रज
  • निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम
  • माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन
  • चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू
  • आत्माराम रावजी देशपांडे – अनिल

Thursday, 11 September 2014

रानवेडी कविता कोलाज काम इयत्ता 3री

रानवेडी कविता कोलाज काम इयत्ता 3री

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

पाहिल्याबरोबर लगेच - प्रथमदर्शनी
जन्मापासून मरेपर्यन्त - आजन्म
कधीही मृत्यू न येणारा - अमर
उपकार जाणणारा - कृतज्ञ
संख्या मोजता न येणारा - असंख्य
मिळूनमिसळून वागणारा - मनमिळाऊ
विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा - वसतिगृह
गुप्त बातम्या कढणारा - गुप्तहेर
कोणतीही तक्रार न करता - विनातक्रार
सतत द्वेष करणारा - दीर्घद्वेषी
आईवडील नसणारा - अनाथ
देवावर विश्वास ठेवणारा - आस्तिक
चार रस्त्यांचा समूह - चौक
झोपेच्या आधीन - निद्राधीन
उपकार न जाणारा - कृतघ्न
लहानापासून थोरांपर्यन्त - आबालवृद्ध
पाहण्यासाठी जमलेले लोक - प्रेक्षक
मनास आकर्षून घेणारे - मनमोहक
गुरे बांधण्याची जागा - गोठा
घोडे बांधण्याची जागा - पागा
दररोज प्रसिद्ध होणारे - दैनिक
आठवड्यातून प्रसिद्ध होणारे - साप्ताहिक
पंधरवड्यातून प्रसिद्ध होणारे - पाक्षिक
महिन्यातून प्रसिद्ध होणारे - मासिक
वर्षातून प्रसिद्ध होणारे - वार्षिक
पाण्याने चहूबाजूंनी वेढलेले - द्वीप
काहीही माहेत नसलेला - अनभिज्ञ
कलेची आवड असणारा - कलावंत
विक्री करणारा - विक्रेता
अजिबात शत्रू नसणारा - अजातशत्रू
जे होणे अशक्य आहे - असंभव
सर्व काही जाणणारा - सर्वज्ञ
दगडासारखे हृदय असणारा - पाषाणहृदयी
चहाड्या करणारा - चहाडखोर
जे माहीत नाही ते - अज्ञात
कहीही न शिकलेले - अशिक्षित
दुसऱ्यावर उपकार करणारा - परोपकारी
रोज घडणारी हकीकत - दैनंदिनी
दुसऱ्यांना मार्गदर्शन करणारा - मार्गदर्शक
सभेत धीटपणे बोलणारा - सभाधीट
कानाला गोड वाटणारे - कर्णमधुर
लोकांचे नेतृत्व करणारा - नेता
सत्याचा आग्रह धरणारा - सत्याग्रही
दगडावर कोरलेला लेख - शिलालेख
कधीही न जिंकला जाणारा - अजिंक्य
लोकांची वस्ती नसलेला भाग - निर्जन
पसंत नसलेला - नापसंत
देवळाच्या आतील भाग - गाभारा
श्रम करून जगणारा - श्रमजीवी
कायमचे लक्षात राहणारे - अविस्मरणीय

Monday, 8 September 2014

साक्षरता

भारतात, ‘राष्ट्रीय साक्षरता मिशनच्या’ अनुसार जर एखादी व्यक्ती आपले नाव लिहु आणि वाचु शकत असेल तर त्या व्यक्तीला साक्षर समजले जाते. वास्तवीक १९८८ मध्ये ‘राष्ट्रीय साक्षरता मिशनची’ सुरुवात झाली होती ती यासाठी की १५ ते ५५ वयोगटातील ७५% लोकांना २००७ पर्यंत कामापुरते साक्षर बनवण्यात यावे आणि त्यायोगे वेळोवेळी केल्या गेलेल्या जनगणनेत साक्षर लोकांची टक्केवारी सुध्दा वाढली. पण आजच्या जगात केवळ एवढ्याच ज्ञानावर एखादी व्यक्ती साक्षर संबोधणे चुकीचे आहे.
पुर्वीच्या काळी निरक्षर लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक होतं होती. मुख्यतः सावकारांकडुन. अश्या लोकांच्या निरक्षरतेचा फायदा घेउन त्यांच्याकडुन अंगठ्यांचे ठसे घेउन मोठ्याप्रमाणात जमीनी, आर्थीक मालमत्ता लाटण्यात आल्या. पुढे सरकारकडुन सावकारांवर बंधंन आली आणि अश्याप्रकारांना आळा बसला. असे असले तरी निरक्षरतेमुळे अश्या समाजाची वाढच खुंटल्यासारखे झाले. व्यवहारी जगात प्रगतीचे अनेक मार्ग उघडे असतानाही असा निरक्षर समाज पारंपारीक व्यवहारांमध्येच गुंतुन पडला त्यामुळे त्यांचे आर्थीक प्रगतीचे मार्ग खुंटले. बालमजुरी, अल्पवयीन गुन्हेगारी, रस्त्यांवर भिक-मागणारे अनेक लहान-लहान मुले यांच्या प्रमाणात निरक्षरतेमुळे वाढ झाली. “एक स्त्री शिकली तर अख्खं कुटुंब शिकतं, सुशिक्षित होतं.” असे ज्योतीबा फुले म्हणाले होते. परंतु काळाच्या ओघात त्यांचे विचारही तितकेसे तग धरु शकले नाहीत. आजही निरक्षरतेमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. निरक्षर पालकांमुळे कुटुंब कल्याण, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, अंधश्रध्दा अश्या अनेक गोष्टी वाढत जातात ज्या इतर समाजाच्या प्रगतीच्या आड येत आहेत. महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारत देश्याच्या शक्तीला पोखरुन काढत आहेत.
लहान मुलांच्या अंगी प्रचंड चैतंन्य असते. त्याला साक्षरतेने योग्य आकार दिला तर हीच मुले पुढे स्वतःचे आणि पर्यायाने देश्याचे भवित्यव्य उज्वल करतील. ‘शेतकर्य़ांच्या आत्महत्या’ चर्चेचा विषय ठरत असतानाच, एखादा शिकलेला साक्षर शेतकरी आपल्या हुशारीचा, ज्ञानाचा वापर करुन पर्यायी मार्ग शोधुन काढतो आणि स्वतःच्या पायावर भक्कम उभा राहीलेला दिसुन येतो. एखादे शिकलेले कुटुंब आपल्या आजारी पाल्याला अंधश्रध्देच्या आहारी जाऊन एखाद्या भोंदु-बाबाकडे न न्हेता गावातील डॉक्टरांकडे घेउन जाते आणि वेळीच औषधं मिळाल्याने त्याचा जिव वाचवताना दिसते. वर्षानुवर्ष दारीद्रात अडकलेल्या कुटुंबातील एखादी मुलगी शिकुन मोठेपणी स्वबळावर उभी रहातेच, परंतु पर्यायाने तिचे कुटुंबही दारीद्रातुन बाहेर पडते. असे एक ना अनेक उदाहरणं आपल्या आजुबाजुला घडताना पहातो. हे सर्व साकार होते ते केवळ आणि केवळ साक्षरतेमुळेच.
आज सरकारने केवळ मुलांसाठीच नाही तर महिला आणि जेष्ठांसाठीही साक्षरता मोहीम हाती घेतली आहे. गावोगावी शाळा उभ्या रहात आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी फि-माफीच्या योजन्या राबवल्या जात आहेत. घरची परिस्थीती बेताची असल्याने दिवसभर कष्ट करुन शिकणासाठी रात्रीच्या शाळासुध्दा सुरु केल्या आहेत,
असं म्हणतात “वाचाल तर वाचाल”. निरक्षरता दुर करण्याची जबाबदारी फक्त सरकारचीच नाही तर तुमच्या आमच्यासारख्या साक्षरांची सुध्दा आहे. सरकारने ह्या साक्षरतेच्या अभियानात एक पाऊल पुढे टाकले आहे, निरक्षर समाजाने दोन पावलं पुढे टाकण्याची गरज आहेच, पण त्याचबरोबर गरज आहे ती आपल्या सारख्यांनी आजुबाजुला वावरणाऱ्या निरक्षर समाजाला साक्षरतेचे महत्व पटवुन देण्याची, त्यांना साक्षर बनवण्याची. निरक्षरता हा राज्यांच्या प्रगतीतील अडथळा असून तो दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. केंद सरकारने सर्वांसाठी शिक्षणाचा कायदा केला आहे. त्याची काटेकोर अमलबजावणी करून भविष्यात राज्याला शंभर टक्के साक्षर करू अशी शपथ घेऊ.

Saturday, 6 September 2014

विज्ञान

[प्र.१] कोणत्या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ २८ फेब्रुवारी हा दिवस "राष्ट्रीय विज्ञान दिन" म्हणून पाळला जातो?
१] डॉ. चंद्रशेखर बोस
२] डॉ.चंद्रशेखर वेंकटरमण
३] डॉ. रामचंद्र वेंकटरमण
४] डॉ. जगदीशचंद्र बोस


उत्तर
------------------
[प्र.२] "सार्वत्रिक गुरुत्वाकर्षणाचा शोध" कोणी लावला?
१] केप्लर
२] आईनस्टाईन
३] न्यूटन
४] एडिसन

उत्तर
------------------
[प्र.३] कर्करोगात पेशींचे विभाजन कोणत्या पद्धतीने होते?
१] सूत्री विभाजन
२] अर्धसुत्री विभाजन
३] अनियंत्रित सूत्री विभाजन
४] अनियंत्रित अर्धसुत्री विभाजन

उत्तर
------------------
[प्र.४] मानवाची श्राव्य मर्यादा _ _ _ _ _ _ या दरम्यान असते.
१] ०.००२ KHz ते ०.२०२ KHz
२] ०.२ KHz ते २.२ KHz
३] ०.०२ KHz ते २० KHz
४] २ KHz ते २० KHz

उत्तर
------------------
[प्र.५] रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते?
१] १००%
२] ९७%
३] ९०%
४] ५०%

उत्तर
------------------
[प्र.६] समुद्राचे पाणी निळ्या रंगाचे दिसते कारण............
१] प्रकाशाचे अपवर्तन
२] प्रकाशाचे अपस्करण
३] प्रकाशाचे विकिरण
४] प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परिवर्तन

उत्तर
------------------
[प्र.७] पुढीलपैकी कोणता परपोशींचा पोषण गट जैविकदृष्ट्या महत्वाचा आहे?
१] प्राणीसदृश्य
२] परजीवी
३] अंत परजीवी
४] मृतोपजीवी

उत्तर
------------------
[प्र.८] सूर्य सोडून पृथ्वीला सर्वात जवळचा तर कोणता?
१] प्रोक्झीमा सेंटॉरी
२] अल्फा सेंटॉरी
३] ध्रुव तारा
४] वेगा

उत्तर
------------------
[प्र.९] पुढीलपैकी कोणता RNA हा DNA पासून जननिक माहितीचे वाहन करतो?
१] rRNA
२] tRNA
३] mRNA
४] xRNA

उत्तर
------------------
[प्र.१०] खालीलपैकी अनानिल श्वसन [Anaerobic Respiration] पद्धतीमध्ये कोणत्या क्रियेचा समावेश होत नाही?
१] दुधाचे दही होणे
२] अल्कोहोल तयार करणे
३] पाव तयार करणे
४] सायट्रिक आम्ल तयार करणे

gk1

[प्र.१] भारतीय नागरीकात्वासंबंधी व्यापक तरतुदी कोणत्या कायद्याने करण्यात आल्या?
१] १९४७चा कायदा
२] १९३५चा कायदा
३] १९५५चा कायदा
४] १९४९चा कायदा


उत्तर
------------------
[प्र.२] राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यामागचा उद्देश काय?
१] राजकीय लोकशाहीची स्थापना
२] सामाजिक लोकशाहीची स्थापना
३] गांधीवादी लोकशाहीची स्थापना
४] सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची स्थापना

उत्तर
------------------
[प्र.३] खालीलपैकी कोणत्या प्रकाराने भारतीय नागरिकत्व प्राप्त होते?
अ] नोंदणी करून
ब] वारसा हक्काने
क] जन्माने

१] फक्त अ आणि क
२] फक्त ब आणि क
३] वरील सर्व
४] फक्त क

उत्तर
------------------
[प्र.४] जनहित याचिका या सकल्पनेचा उगम कोणत्या देशात झाला?
१] नॉर्वे
२] अमेरिका
३] कॅनडा
४] भारत

उत्तर
------------------
[प्र.५] आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता याविषयीचे मार्गदर्शक तत्व कोणते?
१] कलम ४८
२] कलम ४९
३] कलम ५०
४] कलम ५१

उत्तर
------------------
[प्र.६] खालीलपैकी कशाचा समावेश मार्गदर्शक तत्वांमध्ये होतो?
अ] वेठबिगार व मानवी तस्कर बंदी
ब] अंमली पदार्थांच्या सेवनावर बंदी

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही

उत्तर
------------------
[प्र.७] सरकारी नोकरीत समान संधीची तरतूद कोणत्या कलमाने करण्यात आली आहे?
१] कलम १४
२] कलम १६
३] कलम २०
४] कलम २१

उत्तर
------------------
[प्र.८] कोणत्या घटनादुरुस्तीने शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला?
१] २४ वी
२] ४२ वी
३] २५ वी
४] २७ वी

उत्तर
------------------
[प्र.९] योग्य विधाने ओळखा.
अ] रोजगाराचा अधिकार हा मुलभूत हक्क आहे.
ब] संपत्तीचा अधिकार हा कायदेशीर हक्क आहे.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही

उत्तर
------------------
[प्र.१०] कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय मुलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी आदेश काढू शकतात?
१] कलम ३२
२] कलम ३१
३] कलम २२६
४] कलम २१६

gk

[प्र.१] खालीलपैकी कोणत्या शहराला सूर्याची लंबरूप किरणे मिळू शकत नाही?
१] मुंबई
२] भोपाळ
३] जम्मू
४] चेन्नई


उत्तर
------------------
[प्र.२] समान तापमान असणा-या ठिकाणांना जोडणा-या रेषांना काय म्हणतात?
१] समताप रेषा
२] समभार रेषा
३] अक्षवृत्त
४] समशीतोष्ण रेषा

उत्तर
------------------
[प्र.३] आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात आहे?
१] उत्तर अमेरिका
२] आफ्रिका
३] दक्षिण अमेरिका
४] ऑस्ट्रेलिया

उत्तर
------------------
[प्र.४] आस्वान धारण कोणत्या नदीवर आहे?
१] कोलोराडो
२] नाईल
३] अमेझोन
४] झाम्बेझी

उत्तर
------------------
[प्र.५] खालीलपैकी कोणते सरोवर गोड्या पाण्याचे नाही?
१] मान सरोवर
२] जिनेव्हा सरोवर
३] दल सरोवर
४] यापैकी नाही

उत्तर
------------------
[प्र.६] म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
१] नाशिक
२] औरंगाबाद
३] नंदुरबार
४] जळगाव

उत्तर
------------------
[प्र.७] धारवाड खडकात प्रामुख्याने कोणता घटक आढळतो?
१] लोहखनिज
२] कोळसा
३] बॉक्साइट
४] मॅगनीझ

उत्तर
------------------
[प्र.८] "रत्नांची भूमी" म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?
१] भुवनेश्वर
२] मणिपूर
३] बंगलोर
४] कोलकत्ता

उत्तर
------------------
[प्र.९] खालीलपैकी कोणती भाषा "इंडो-आर्यन" या प्रकारात येत नाही?
१] ओरिया
२] मराठी
३] गुजराती
४] तामिळ

उत्तर
------------------
[प्र.१०] "लिंगराज मंदिर" खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
१] भुवनेश्वर
२] कोलकत्ता
३] दिसपूर
४] गुवाहाटी

Wednesday, 3 September 2014

भारताचे जनक/शिल्पकार

  • आधुनिक भारताचे जनक- राजा राममोहन रॉय
  • आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू.
  • भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.
  • भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी
  • भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक.
  • भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल.
  • मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
  • भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक - दादासाहेब फाळके.
  • भारताच्या अनुविज्ञानाचे जनक - डॉ.होमी भाभा.
  • आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.
  • आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.
  • स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक - लॉर्ड रिपन.
  • भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.
  • भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन.
  • भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे.
  • भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई.
  • भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक - सॅम पित्रोदा.

इतिहास

इतिहास

[प्र.१] अयोग्य विधान ओळखा.
१] स्थापना  १८८५मध्ये झाली.
२] राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुणे येथे भरले होते.
३] राष्ट्रसभेचे जनक अॅलन ह्यूम होते.
४] इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर राष्ट्रसभेच्या नेत्यांची दृढ श्रद्धा होती.

उत्तर
------------------
[प्र.२] समाजसुधारक व त्यांची जन्म्स्थळे यांच्या योग्य जोड्या लावा.
अ] एम.जी.रानडे                                             १] जमखिंडी
ब] जी.जी.आगरकर                                         २] टेंभू
क] व्ही.आर.शिंदे                                             ३] पुणे
ड] जी.एच.देशमुख                                           ४] निफाड

पर्याय
१] अ-२/ब-१/क-३/ड-४
२] अ-३/ब-१/क-४/ड-२
३] अ-४/ब-२/क-१/ड-३
४] अ-२/ब-४/क-३/ड-१

उत्तर
------------------
[प्र.३] 'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण?
१] अशोक कोठारी
२] डॉ.एस.एन.सेन
३] अशोक मेहता
४] वि.डी.सावरकर

उत्तर
------------------
[प्र.४] पंडिता रमाबाईंशी निगडीत चुकीचे विधान ओळखा.
१] 'शारदासन' आणि 'मुक्तिसदन'ची स्थापना
२] 'स्त्रीकोश' या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन केले.
३] निराश्रित विधवा स्त्रियांसाठी 'कृपासदन' व 'प्रीतीसादन'
४] त्यांच्या कार्याबद्दल "कैसर ए हिंद" हि पदवी बहाल

उत्तर
------------------
[प्र.५] १९३५च्या भारत सरकारच्या कायद्याची खालीलपैकी वैशिष्ट्ये कोणती?
अ] प्रांतीय स्वायत्तता
ब] संघराज्याचे न्यायालय
क] केंद्रात द्विदल राज्यपद्धती
ड] दोन सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ

१] अ आणि ड फक्त
२] अ, क, ड फक्त
३] वरील सर्व
४] ब आणि क फक्त

उत्तर
------------------
[प्र.६] मुस्लिम लीगने मुक्ती दिन केव्हा साजरा केला?
१] १९२६ मध्ये, जेव्हा स्वराज्य पक्षाने प्रांतातील आपले बहुमत गमावले
२] १९२९ मध्ये, कॉंग्रेसने पूर्ण स्वराज्याची मागणी जाहीर केली त्यानंतर
३] १९३२ मध्ये, सरकारने कॉंग्रेसला बेकायदा घोषित केले तेव्हा
४] १९३९ मध्ये, द्वितीय जागतिक महायुद्धात भारताला ढकलले , त्याचा निषेध म्हणून प्रांतातील कोंग्रेसच्या मंत्र्याची राजीनामे दिले तेव्हा

उत्तर
------------------
[प्र.७] पुढीलपैकी कोणती/कोणत्या व्यक्ती १८५७च्या उठावाशी संबंधित नाही?
अ] पेठचा राजा भगवंतराव
ब] अजीजन नर्तिका
क] गुलमार दुबे
ड] काश्मीरचा राजा गुलाबसिंह

१] अ आणि ब फक्त
२] ब आणि ड फक्त
३] अ, ब, क
४] ड फक्त

उत्तर
------------------
[प्र.८] पुढीलपैकी कोणत्या गोष्टी वि.दा.सावरकरांनी समाज सुधारणेसाठी केल्या?
अ] विविध जातीतील स्त्रियांचे हळदी-कुंकू कार्यक्रम योजले.
ब] स्पृश्य-अस्पृश्य यांचे एकत्र भोजनाचे कार्यक्रम योजले.
क] आंतर-जातीय विवाहांना प्रोत्साहन दिले.
ड] धर्मांतर केलेल्या हिंदूंना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी शुद्धीकरण चळवळ राबविली.

१] अ, क
२] ब फक्त
३] ब, क आणि ड
४] वरील सर्व

उत्तर
------------------
[प्र.९] १८९० मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रीय सभेच्या ब्रिटीश समितीमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या?
१] दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, ब्राडलॉ, हॉवर्ड
२] ह्यूम, टिळक, ब्राडलॉ, नॉरटोन
३] यूल, ह्यूम, अॅडम्स, नॉरटोन, हॉवर्ड
४] यूल, ह्यूम, अॅडम्स, ब्राडलॉ

उत्तर
------------------
[प्र.१०] पुढीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरु केली?
१] नंदाताई गवळी
२] जाईबाई चौधरी
३] वेणूताई भटकर
४] तुळसाबाई बनसोडे

उत्तर
------------------
[प्र.११] १९व्या शतकामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टीकोनातून मांडणी कोणी केली?
अ] दादाभाई नौरोजी
ब] एम.जी.रानडे
क] रोमेशचन्द्र दत्त
ड] आर.सी.मुजुमदार

१] अ फक्त
२] अ आणि ब फक्त
३] अ, ब आणि क
४] अ आणि ड फक्त

उत्तर
------------------
[प्र.१२] पुढील घटना कालानुक्रमे लावा.
अ] नेहरू रेपोर्ट
ब] सायमन कमिशन
क] मुडीमन कमिशन
ड] प्रांतीय द्विदलशासन पद्धती

१] अ-ब-क-ड
२] ड-क-ब-अ
३] ड-ब-क-अ
४] ब-क-अ-ड

उत्तर
------------------
[प्र.१३] ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली?
१] १७९३चा सनदी कायदा
२] १८१३चा सनदी कायदा
३] १७७३चा नियमनाचा कायदा
४] १८५८चा भारताच्या सुशासनाचा कायदा

उत्तर
------------------
[प्र.१४] पुढील घटना कालानुक्रमे लावा.
अ] समाजवादी पक्षाची स्थापना
ब] कॉंग्रेसचे पाटणा अधिवेशन
क] श्वेतपत्रिका
ड] तिसरी गोलमेज परिषद

१] क-ब-अ-ड
२] ड-क-ब-अ
३] अ-ड-क-ब
४] ब-अ-ड-क

उत्तर
-------------------------

Tuesday, 2 September 2014

नारी शिक्षा


नारी शिक्षा कहा गया है जंहा स्त्रियों की पूजा होती है वंहा देवता निवास करते हैं । प्राचीन काल से ही नारी को ‘गृह देवी’ या ‘गृह लक्ष्मी’ कहा जाता है । प्राचीन समय में नारी शिक्षा पर विशेष बल दिया जाता था । परन्तु मध्यकाल में स्त्रियों की स्थिति दयनीय हो गयी । उसका जीवन घर की चारदीवारी तक सिमित हो गया । नारी को परदे में रहने के लिए विवश किया गया । स्त्री-पुरुष जीवन-रूपी रथ के दो पहिये हैं, इसलिए पुरुष के साथ साथ स्त्री का भी शिक्षित होना जरुरी है । यदि माता सुशिक्षित होगी तो उसकी संतान भी सुशील और शिक्षित होगी । शिक्षित गृहणी पति के कार्यों में हाथ बंटा सकती है, परिवार को सुचारु रूप से चला सकती है । स्त्री-शिक्षा प्रसार होने से नारी आर्थिक दृष्टि से आत्मनिर्भर बनेगी। अपने अधिकारों और कर्त्तव्यों के प्रति सचेत होगी । आदर्श गृहणी परिवार का आभूषण और समाज का गौरव होती है । स्त्री के लिए किताबी शिक्षा के साथ साथ नैतिक शिक्षा भी बहुत जरुरी है । स्त्री गृह कार्य में कुशल होने के साथ साथ वह समाजसेवा में भी योगदान दे सके । नारी का योगदान समाज में सबसे ज्यादा होता है । बच्चों के लालन-पालन, शिक्षा से लेकर नौकरी तक नारी हर क्षेत्र में पुरुषों से आगे है । अतः नारी को कभी कम नहीं आंकना चाहिए और उसका सदा सम्मान करना चाहिए ।