- सांग सांग भोलानाथ
- चांदोबा भागलास का
- गोरी गोरी पान
- झुक झुक आगीनगाडी
- नको ताई रुसू
- येरे येरे पावसा
- असावा सुंदर चोक्लेटचा बंगला
- शुभंकरोती कल्याणं
- चिमणे चिमणे वारा घाल
- म्हातारीची शेती होती
- चुलीवरची खीर एकदा
- बांधूया बंगला
- पुस्तक नंतर वाचा
- एक-दोन-तीन
- चन्ना जोर गरम
- चिऊताई चिऊताई
- नंदीबैल आला
- आडम तडम
- करंगळी मरंगळी
- आंबा पिकतो रस गळतो
- दिन दिन दिवाळी
- अटक मटक
- अकन माती
- ताल वाजे
- मिठू मिठू पोपट
Sunday, 12 October 2014
शिवाजी शहाजी भोसले
| शिवाजी शहाजी भोसले | ||
|---|---|---|
| छत्रपती | ||
| छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे लंडन इथल्या ब्रिटिश संग्रहालयातील अस्सल चित्र | ||
| छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची राजमुद्रा | ||
| अधिकारकाळ | जून ६, १६७४ - एप्रिल ३, १६८० | |
| राज्याभिषेक | जून ६, १६७४ | |
| राज्यव्याप्ती | पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावर पर्यंत |
|
| राजधानी | रायगड किल्ला | |
| पूर्ण नाव | शिवाजीराजे शहाजीराजे भोसले | |
| जन्म | फेब्रुवारी १९, १६३० | |
| शिवनेरी किल्ला, पुणे | ||
| मृत्यू | एप्रिल ३, १६८० | |
| रायगड | ||
| उत्तराधिकारी | छत्रपती संभाजीराजे भोसले | |
| वडील | शहाजीराजे भोसले | |
| आई | जिजाबाई | |
| पत्नी | सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सकवारबाई |
|
| राजघराणे | भोसले,सिसोदिया(भोसावत) | |
| राजब्रीदवाक्य | 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।' | |
| चलन | होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन??)
| |
Tuesday, 7 October 2014
Wednesday, 1 October 2014
लालबहादूर शास्त्री
लालबहादूर
शास्त्री (रोमन
लिपी: Lal
Bahadur Shastri) (२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ - ११ जानेवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी
पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान
युद्ध घडले. सोव्हियेत
संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर
युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हियेत
संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स. १९६६ रोजी यांचा हृदयविकाराचे
दोन झटके येऊन मृत्यू झाला.
जीवन
२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ साली वाराणसी येथे एका गरीब, प्राथमिक शिक्षकाच्या घरी त्यांचा
जन्म झाला. ते दीड वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे वडील
निधन पावले. माता रामदुलारी आपल्या मुलांना पदराखाली घालून माहेरी आली. प्राथमिक
शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण
वाराणशीला झाले. तेथे त्यांना निल्कामेश्वर प्रसाद असे पितृतुल्य गुरू भेटले.
त्यांनी महात्मा
गांधी, लोकमान्य
टिळक, लाला
लजपतराय यांच्या जीवनदर्शनाचे तज्ञ्ल्त्;व त्यांना समजाविले.
वयाच्या
अकराव्या वर्षी बनारस हिंदू
विश्वविद्यालयाची किनशिला बसविण्यासाठी आलेले
गांधीजी त्यांना दिसले. तिथे त्यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले. मग त्यांनी
गांधीजींची पाठ सोडली नाही. चंपारण्य सत्याग्रह, रौलेट अॅक्ट, जालियनवाला हत्याकांड इत्यादी घटनांचे प्रतिसाद
त्यांच्या मनात घर करून बसले. विदेशीवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर यातच लालबहादूर गुंतले व त्यातून
सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल झाले. काशी
विद्यापीठाचे 'शास्त्री' झाले.( त्यांचे मूळ आडनाव 'श्रीवास्तव' हे होते.) 'सर्व्हटस ऑफ दि पीपल्स' सोसायटीचे सदस्य झाले. शैक्षणिक आणि सामाजिक
सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. समानतेचे सूत्र होते. इ.स. १९२८ साली लाला लजपतराय
गेले व पुरूषोत्तमदास टंडन सोसायटीचे अध्यक्ष झाले. ते अलाहाबादला दाखल झाले. त्यांचीच
अध्यक्ष म्हणून निवड झाली.
विधायक कार्यकत्र्यांची ती पाठशाळाच होती. आचार्य नरेंद्र देव, आचार्य कृपलानी, डॉ. भगवानदास, डॉ. संपूर्णानंद, श्रीप्रकाश यांचा परिचय व मैत्री
झाली.
नेहरू, शास्त्रीना कॉंग्रेसचे मवाळ धोरण
मान्य नव्हते. इ.स. १९३७ मध्ये सत्याग्रह करून ते कारावासात गेले. सत्तेची लालसा
नव्हती; पण इ.स. १९४६ साली निवडणुका झाल्या. ते
गोविदवल्लभ पंतांचे सेेक्रटरी झाले. पंत गेल्यावर ते उत्तर
प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. इ.स. १९५१ साली
मध्ये त्यांनी पं. जवाहरलालजींनी त्यांना काॅंग्रेसचे सचिव केले. इ.स. १९५६ साली
त्यांना रेल्वेमंत्रीपद दिले. पण
एका अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी त्या पदाचा राजिनामा दिला. इ.स. १९५७ मध्ये त्यांनी
कॉंग्रेसला निवडणुका जिंकून दिल्या. २७मे, इ.स. १९६४ला नेहरू गेले. त्यानंतर लालबहादूर एकमताने पंतप्रधान झाले. पाकिस्तानला ही सुसंधी वाटली. पाकिस्तानने
भारतावर आक्रमण केले. 'जय जवान, जय किसान' हा घोषणामंत्र वातावरणात निनादला.
भारताने पाकिस्तानला नमविले. युनोने युद्धबंदी केली. रशियाने मध्यस्थी केली. १० जानेवारी, इ.स. १९६६ रोजी ह्रदयविकाराच्या
तीव्र झटल्याने त्यांची जीवनज्योत
मालवली. त्यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.
Subscribe to:
Posts (Atom)
