Wednesday, 22 October 2014

शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प

शालेय विद्यार्थ्यांसाठी  प्रकल्प
प्रकल्प म्हणजे काय ?

             विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.

प्रकल्पाची उद्दिष्टे –

1. स्वयंअध्ययनाची सवय लावणे.

2. स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.

3. स्वतःमध्ये उपजतच असणा-या निरीक्षण, निवेदन, संकलन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे.

4. तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.

5. कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडवणे.

6. आत्मविश्वास प्राप्त करणे.

7. या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयाची खास वैशिष्ट्ये अभ्यासणे. उदा.- भाषा विषय – उच्चतम शुद्धता, पाठांतर क्षमता, विचार मांडण्याची क्षमता इत्यादी.

प्रकल्पकार्य लेखन कसे कराल?

प्रकल्पकार्य करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच केलेल्या प्रकल्पकार्याचे सुयोग्य प्रकारे लेखन करणेही महत्त्वाचे आहे, कारण निवेदन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे आणि तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे ही प्रकल्पाची उद्दिष्टे तुमच्या प्रकल्पकार्य लेखनातून मूर्त स्वरूप घेणार आहेत. प्रकल्पकार्य लेखन कसे करावे, याचे मुद्देसूद मार्गदर्शन पुढे दिलेले आहे –


( विद्यार्थ्यांसाठी )
1. प्रकल्पाचे नाव (विषयासह) – निवडलेल्या अभ्यासक्रमातील विषयाचे नाव प्रथम लिहा. नंतर त्या विषयातील निवड केलेल्या प्रकल्पाचे नाव लिहा.

2. प्रकल्पाचा प्रकार – निवड केलेला प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा उल्लेख करा – सर्वेक्षणात्मक प्रकल्प, संग्रहात्मक प्रकल्प, संकलनात्मक प्रकल्प, रचनात्मक प्रकल्प, तक्त्यांच्या निर्मितीचा प्रकल्प, प्रतिकृती निर्मितीचा प्रकल्प.

3. प्रकल्पाची उद्दिष्टे – निवड केलेल्या प्रकल्पाची सुयोग्य उद्दिष्टे लिहा.

4. प्रकल्पाचे साहित्य – विषयासंबंधित पाठ्यपुस्तक, लेखनसाहित्य, उपयुक्त साधने यांचा उल्लेख करा.

5. प्रकल्पाची कार्यपद्धती – प्रकल्प साकारत असताना करण्यात येणा-या कृतींचा उल्लेख क्रमवार पद्धतीने करा.

6. प्रकल्पाचे निवेदन – यामध्ये निवड केलेल्या प्रकल्प करण्यामागचा हेतू अधिक स्पष्ट करून मांडा.

7. प्रकल्पाचे सादरीकरण – संकलित केलेल्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करा. संकलन करतेवेळी आलेल्या विशेष अनुभवांची नोंद करा. तसेच त्यावेळी मिळालेल्या सहकार्याचा, मदतकार्याचाही उल्लेख करा. घेतलेल्या संदर्भसाहित्याची नोंद करा.

8. आकृत्या व चित्रांकनासाठी – येथे प्रकल्पाशी संबंधित चित्रे, आकृत्या, नकाशे चिकटवा आणि योग्य प्रकारे सुशोभन करा.

( शिक्षकांसाठी )
9. प्रकल्पपुर्तीसाठी वेळोवेळी केलेल्या विशेष बाबींची नोंद – यामध्ये निवड केलेल्या प्रकल्पाबाबतीतील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची नोंद करा. 

10. मूल्यमापन – यामध्ये केलेल्या प्रकल्पाची कोणकोणती उद्दिष्टे साध्य झाली? कोणते ज्ञान प्राप्त झाले? प्रकल्पासंबंधीचे स्वतःचे मत किंवा अभिप्राय लिहा. तसेच प्रकल्प पर्ण करताना मिळालेल्या स्वानंदाचा उल्लेख एक-दोन वाक्यांत करा.

शालेय प्रकल्पांसाठी यादी
1. माहिती संकलन –

                                 थोर संत, थोर समाजसुधारक, थोर राष्ट्रपुरूष, थोर शास्त्रज्ञ, थोर खेळाडू, थोर समाजसेवक, थोर समाजसेविका इत्यादी.

2. संग्रह –

                   म्हणीसंग्रह, वाक्प्रचार संग्रह, अभंगसंग्रह, श्लोक संग्रह, सुविचार संग्रह, कवितासंग्रह, भावगीत संग्रह, पोवाडा संग्रह, समरगीत संग्रह, देशभक्तीपर गीत संग्रह, पशु-पक्षी यांच्या चित्रांचा संग्रह, शंख-शिंपले संग्रह, तिकिटे संग्रह, जुनी नाणी संग्रह इत्यादी.

3. प्रदर्शन –

                    चित्रकलाकृती प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, पुस्तके प्रदर्शन, विज्ञानप्रकल्प प्रदर्शन, विविध प्रकारच्या खेळण्यांचे प्रदर्शन इत्यादी.

4. तक्ते –

                   शालेय शैक्षणिक विषयातील विविध घटकांचे तक्ते इत्यादी.

5. आदर्श –

                   आदर्श बालक-बालिका, आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी, आदर्श शिक्षक-शिक्षिका, आदर्श शाळा, आदर्श समाजसेवक-समाजसेविका, आदर्श महिला, आदर्श गाव, आदर्श शहर, आदर्श राष्ट्र इत्यादी.

कृतिसंशोधन

कृतिसंशोधन
संकल्पना-
                शिक्षक दैनंदिन अध्ययन-अध्यापन करीत असतांना अनेक समस्या, अडचणी येतात. त्या समस्या, अडचणी दूर करून विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करावे लागतात. शिक्षक वर्गाध्यापनात येणा-या अडचणी लगेचच सोडविण्याची आवश्यकता असते. आपले प्रश्न, आपल्या समस्या, आपल्या अडचणी आपणच सोडविणे हेही गरजेचे असते. या समस्या सोडविण्यासाठी काही उपाय विचारपूर्वक योजावे लागतात. हे उपाय योजणे व त्यांचा अचूक परिणाम साधणे यासाठी शिक्षकांची अंतर्दृष्टी विकसित व्हावी लागते. अनेक शिक्षक आपल्या समस्या सोडविण्यासाठी असे प्रयत्न करीत असतात. अशा प्रयत्नांना कृतिसंशोधनाचे स्वरूप लाभते.

                दैनंदिन जीवनात ज्या विविध शैक्षणिक समस्यांना तोंड द्यावे लागते, त्यासंबंधी शिक्षकांनी प्रत्यक्ष कृतियुक्त उपाय योजून त्या उपायांच्या परिणामकारकतेची तपासणी केली तर त्याला शैक्षणिक कृतिसंशोधन म्हणतात.

                डॉ. स्टीफन कोवे – आपले निर्णय व उपक्रम यांच्याबाबत मार्गदर्शन मिळावे, त्यात सुधारणा व्हाव्यात व त्यांचे योग्य त-हेने मूल्यमापन व्हावे म्हणून व्यावसायिकांनी आपल्या समस्यांचा वैज्ञानिक पद्धतीने स्वतःच अभ्यास करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कृतिसंशोधन होय.

कृतिसंशोधनाची उद्दिष्टे –

१. दैनंदिन शैक्षणिक व्यवहारात निर्माण झालेल्या समस्यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे.

२. समस्या सोडविण्यासाठी योग्य उपायांचा शोध घेणे व उपायांचा वापर करून निष्कर्ष काढणे.

३. निष्कर्षांना अनुसरून आपल्या शालेय कामकाजात योग्य तो बदल करून कामाचा शैक्षणिक दर्जा उंचावणे.

                                              कृतिसंशोधनाच्या पाय-या –

               शालेय विषयांतील एखाद्या समस्येचे निराकरण शास्त्रशुद्ध पद्धतीने करत असताना कृतिसंशोधनातील टप्प्यांचा आधार घ्यावा लागतो. ते टप्पे / पाय-या पुढीलप्रमाणे-

१. स्थूल समस्या

२. निश्चित समस्या

३. संभाव्य कारणे

४. गृहीत कृत्य

५. वस्तुस्थितीनिश्चिती

६. उपाययोजना

७. मूल्यमापन

८. उपयोजन

अहवाल लेखन –

                आराखड्यानुसार संशोधन कार्य पूर्ण झाले की त्याचा अहवाल लिहून काढणे ही त्या कार्याची इतिश्री असते.

संशोधन अहवाल लेखन म्हणजे संशोधन कार्य पूर्ण केल्याची पावती आहे. या अहवालाचा उपयोग समान परिस्थितीत संशोधन करणा-यांना होऊ शकतो. या संशोधनातून प्राप्त झालेली फलिते, त्यांचे निष्कर्ष व केलेल्या शिफारशी इतरांना कळाव्यात व त्यांचा त्यांनी लाभ घ्यावा. स्वतः संशोधकास व इतरांना चांगले कृतिसंशोघन अहवाल वाचून ल्वतःचे कृतिसंशोधन करण्.ची कार्यपद्धती ठरवितांना दिशा मिळू शकते. यासाठी अहवाल उपयुक्त ठरतो.

              कृतिसंशोधन अहवाल लेखनाचे तीन विभाग असतात.

१) प्राथमिक विभाग -
  • मुखपृष्ठ
  • प्रथम पृष्ठ
  • दाखला / प्रतिज्ञापत्र
  • ऋणनिर्देश
  • अनुक्रमणिका

२) प्रमुख विभाग –
  • संशोधन विषयाची ओळख
  • संशोधनासंबंधित साहित्याचा आढावा
  • संशोधनाची कार्यवाही
  • माहितीचे संकलन, विश्लेषण व अर्थनिर्वचन
  • सारांश, निष्कर्ष व शिफारशी


३) अंतिम विभाग -
  • ग्रंथसूची
  • परिशिष्टे

Sunday, 12 October 2014

प्रश्नसंच ५५ - [पंचायत राज]

[प्र.१] त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील कोणत्या स्तराला वसंतराव नाईक समितीने जास्त महत्व दिले?
१] जिल्हा परिषद
२] पंचायत समिती
३] ग्रामपंचायत
४] ग्रामसभा

उत्तर
----------------
[प्र.२] ग्रामपंचायतीची कमीत कमी सदस्य संख्या किती असू शकते?
१] ५
२] ७
३] ९
४] १०

उत्तर
----------------
 [प्र.३] द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली?
१] वसंतराव नाईक
२] बलवंतराय मेहता
३] पी.बी.पाटील
४] अशोक मेहता

उत्तर
----------------
[प्र.४] प्रशासकीय सुधारणा आयोगाने खालीलपैकी कोणत्याशिफारसी केल्या होत्या?
अ] पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा या स्तराला जास्त महत्व असावे.
ब] ग्रामसभेच्या वर्षातून किमान २ बैठका व्हाव्यात.
क] ग्रामपंचायतीचे सदस्य हे पंचायत समितीचे पदसिद्ध सदस्य असावे.

१] फक्त अ
२] फक्त अ व ब
३] फक्त अ व क
४] वरील सर्व

उत्तर
----------------
[प्र.५] त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील कोणत्या स्तराला बलवंतराय मेहता समितीने जास्त महत्व दिले?
१] जिल्हा परिषद
२] पंचायत समिती
३] ग्रामपंचायत
४] ग्रामसभा

उत्तर
----------------
[प्र.६] पंचायत समितीमध्ये अप्रत्यक्ष निवडणुकीच्या तत्वाऐवजी प्रत्यक्ष निवडणुकीच्या तत्वाचा वापर करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली?
१] अशोक मेहता
२] वसंतराव नाईक
३] ल.ना.बोंगिरवार
४] पी.बी.पाटील

उत्तर
----------------
[प्र.७] 'प्रौढ शिक्षण कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे सोपविण्यात यावा' अशी शिफारस कोणत्या समितीने केली?
१] वसंतराव नाईक
२] बलवंतराय मेहता
३] पी.बी.पाटील
४] अशोक मेहता

उत्तर
----------------
[प्र.८] पी.बी.पाटील समितीने सरपंचाच्या एकूण जागेपैकी किती टक्के जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवण्याची शिफारस केली?
१] ५०%
२] २५%
३] २७%
४] ३३%

उत्तर
----------------
[प्र.९] वसंतराव नाईक समितीने आपला अहवाल राज्य शासनाला कधी सादर केला?
१] १६ जून १९६२
२] १५ मार्च १९६१
२] २४ डिसेंबर १९६१
३] २ ऑक्टोबर १९६२

उत्तर
----------------
[प्र.१०] अशोक मेहता समितीच्या स्थापनेचा उद्देश खालीलपैकी कोणता होता?
अ] पंचायत राजमध्ये ग्रामीण जनतेचा सहभाग वाढविणे.
ब] पंचायत राजचे मूल्यमापन करणे.
क] पंचायत राज व्यवस्थेचे मूल्यमापन करणे.

१] फक्त अ
२] फक्त अ व ब
३] फक्त अ व क
४] वरील सर्व

महाराष्ट्रातील अभयारण्ये

महाराष्ट्रातील अभयारण्ये


  • अनेर - धुळे
  • अंधेरी - चंद्रपूर
  • औट्रमघाट - जळगांव
  • कर्नाळा - रायगड
  • कळसूबाई - अहमदनगर
  • काटेपूर्णा - अकोला 
  • किनवट - यवतमाळ
  • कोयना - सातारा
  • कोळकाज - अमरावती
  • गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
  • चांदोली - सांगली, कोल्हापूर
  • चापराला - गडचिरोली
  • जायकवाडी - औरंगाबाद 
  • ढाकणा कोळकाज - अमरावती
  • ताडोबा - चंद्रपूर
  • तानसा - ठाणे
  • देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर
  • नवेगांव - भंडारा
  • नागझिरा - भंडारा
  • नांदूर मध्यमेश्वर - चंद्रपूर
  • नानज - सोलापूर
  • पेंच - नागपूर
  • पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
  • फणसाड - रायगड
  • बोर - वर्धा
  • बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
  • भिमाशंकर - पुणे, ठाणे
  • मधमेश्वर - चंद्रपूर
  • मालवण - सिंधुदुर्ग 
  • माळढोक - अहमदनगर, सोलापूर
  • माहीम - मुंबई
  • मुळा-मुठा - पुणे
  • मेळघाट - अमरावती
  • यावल - जळगांव
  • राधानगरी - कोल्हापूर
  • रेहेकुरी - अहमदनगर
  • सागरेश्वर - सांगली

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे


  • आंबोली (सिंधुदुर्ग)
  • खंडाळा (पुणे)
  • चिखलदरा-गाविलगड (अमरावती)
  • जव्हार (ठाणे)
  • तोरणमाळ (नंदुरबार)
  • पन्हाळा (कोल्हापूर)
  • पाचगणी (सातारा)
  • भिमाशंकर (पुणे)
  • महाबळेश्वर (सातारा)
  • माथेरान (रायगड)
  • मोखाडा (ठाणे)
  • म्हैसमाळ (औरंगाबाद)
  • येडशी (उस्मानाबाद)
  • रामटेक (नागपूर)
  • लोणावळा (पुणे)
  • सूर्यामाळ (ठाणे)

शिवाजी शहाजी भोसले

शिवाजी शहाजी भोसले
छत्रपती
Shivaji British Museum.jpg
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे लंडन इथल्या ब्रिटिश संग्रहालयातील अस्सल चित्र
Shivaji Maharaj Rajmudra.jpg
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची राजमुद्रा
अधिकारकाळ जून ६, १६७४ - एप्रिल ३, १६८०
राज्याभिषेक जून ६, १६७४
राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,
सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत
आणि
उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून
दक्षिण भारतात तंजावर पर्यंत
राजधानी रायगड किल्ला
पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
जन्म फेब्रुवारी १९, १६३०

शिवनेरी किल्ला, पुणे
मृत्यू एप्रिल ३, १६८०

रायगड
उत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले
वडील शहाजीराजे भोसले
आई जिजाबाई
पत्नी सईबाई,
सोयराबाई,
पुतळाबाई,
काशीबाई,
सकवारबाई
राजघराणे भोसले,सिसोदिया(भोसावत)
राजब्रीदवाक्य 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'
चलन होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन??)

Wednesday, 1 October 2014

4थी प्रथम सत्र परिसर अभ्यास संकलित मूल्यमापन


लालबहादूर शास्त्री


लालबहादूर शास्त्री (रोमन लिपी: Lal Bahadur Shastri) (२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ - ११ जानेवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हियेत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हियेत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स. १९६६ रोजी यांचा हृदयविकाराचे दोन झटके येऊन मृत्यू झाला.
जीवन
२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ साली वाराणसी येथे एका गरीब, प्राथमिक शिक्षकाच्या घरी त्यांचा जन्म झाला. ते दीड वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे वडील निधन पावले. माता रामदुलारी आपल्या मुलांना पदराखाली घालून माहेरी आली. प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणशीला झाले. तेथे त्यांना निल्कामेश्वर प्रसाद असे पितृतुल्य गुरू भेटले. त्यांनी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय यांच्या जीवनदर्शनाचे तज्ञ्ल्त्;व त्यांना समजाविले.
वयाच्या अकराव्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची किनशिला बसविण्यासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसले. तिथे त्यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले. मग त्यांनी गांधीजींची पाठ सोडली नाही. चंपारण्य सत्याग्रह, रौलेट अ‍ॅक्ट, जालियनवाला हत्याकांड इत्यादी घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले. विदेशीवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर यातच लालबहादूर गुंतले व त्यातून सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल झाले. काशी विद्यापीठाचे 'शास्त्री' झाले.( त्यांचे मूळ आडनाव 'श्रीवास्तव' हे होते.) 'सर्व्हटस ऑफ दि पीपल्स' सोसायटीचे सदस्य झाले. शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. समानतेचे सूत्र होते. इ.स. १९२८ साली लाला लजपतराय गेले व पुरूषोत्तमदास टंडन सोसायटीचे अध्यक्ष झाले. ते अलाहाबादला दाखल झाले. त्यांचीच अध्यक्ष म्हणून निवड झाली. विधायक कार्यकत्र्यांची ती पाठशाळाच होती. आचार्य नरेंद्र देव, आचार्य कृपलानी, डॉ. भगवानदास, डॉ. संपूर्णानंद, श्रीप्रकाश यांचा परिचय व मैत्री झाली.
नेहरू, शास्त्रीना कॉंग्रेसचे मवाळ धोरण मान्य नव्हते. इ.स. १९३७ मध्ये सत्याग्रह करून ते कारावासात गेले. सत्तेची लालसा नव्हती; पण इ.स. १९४६ साली निवडणुका झाल्या. ते गोविदवल्लभ पंतांचे सेेक्रटरी झाले. पंत गेल्यावर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. इ.स. १९५१ साली मध्ये त्यांनी पं. जवाहरलालजींनी त्यांना काॅंग्रेसचे सचिव केले. इ.स. १९५६ साली त्यांना रेल्वेमंत्रीपद दिले. पण एका अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी त्या पदाचा राजिनामा दिला. इ.स. १९५७ मध्ये त्यांनी कॉंग्रेसला निवडणुका जिंकून दिल्या. २७मे, इ.स. १९६४ला नेहरू गेले. त्यानंतर लालबहादूर एकमताने पंतप्रधान झाले. पाकिस्तानला ही सुसंधी वाटली. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. 'जय जवान, जय किसान' हा घोषणामंत्र वातावरणात निनादला. भारताने पाकिस्तानला नमविले. युनोने युद्धबंदी केली. रशियाने मध्यस्थी केली. १० जानेवारी, इ.स. १९६६ रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटल्याने त्यांची जीवनज्योत मालवली. त्यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.