Pages

Saturday, 20 December 2014

सत्य शेवटी एक असे
परमात्म्याची सर्व लेकरे, अनेक रूपी जरी दिसे
एका तरुची फळे, फुलेही, बीज तयांचे एक असे
नानारंगी, नानागंधी, नाना पुष्पांची ही माला
फुले भलेही वेगवेगळी, माळ परंतु एक असे

चीन, अमेरिका, जपान रशिया अथवा भारत पाकिस्थान
देशांची ही अनेक नावे, भूमी तर ही एक असे
अरबी, हिंद महासागर, वा पॅसिफिकही म्हणा तया
नाव भिन्न दिले तरीही, जलनिधी हा एक असे

कुणी ऊंच तर कुणी ठेंगणा, रंग, भाषा असती नाना
विविध भासे भेद तरही, आत्मरुपाने एक असे
प्रकार अवघे सत्य समजूनी, आपसांत का वैर करी
सोडा, सोडा भ्रम हे सारे, सत्य शेवटी एक असे

No comments:

Post a Comment